'बालिका वधू'ची आनंदी आहे गडगंज श्रीमंत; जाणून घ्या, लाखो रुपये चार्ज करणाऱ्या अविका गौरचं net worth
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 15:44 IST2022-07-08T15:41:14+5:302022-07-08T15:44:22+5:30
Avika gor: आज अविका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ती एका मालिकेसाठी लाखो रुपयांचं मानधन घेते.

बालविवाहावर आधारित 'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर (avika gor).
वयाच्या १० व्या वर्षापासून अविकाने कलाविश्वात नशीब आजमावण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये गिनी अँड जॉनी यांच्यासाठी रॅम्प वॉक केला होता.
फॅशन वीकमध्ये झळल्यानंतर अविकाने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. बालिका वधू या मलिकेतून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
या मालिकेत काम करत असताना तिचं वय अवघे ११ वर्ष वर्ष होतं. या मालिकेनंतर अविकाने मॉर्निंग वॉक, पाठशाला, तेज या चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच काही मालिकांमध्येही ती झळकली.
अविकाने दाक्षिणात्य कलाविश्वातही नशीब आजमावलं असून तिने २०१३ मध्ये Uyyala Jampala या तेलुगू चित्रपटात काम केलं. त्यानंतर, Lakshmi Raave Maa Intiki, Cinema Choopistha Mava आणि Thanu Nenu या चित्रपटांमध्ये झळकली.
आज अविका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ती एका मालिकेसाठी लाखो रुपयांचं मानधन घेते.
अविका छोट्या पडद्यावरील महागडी अभिनेत्री असून तिचं मानधनदेखील त्याच पद्धतीचं आहे.
https://favcelebswiki.com/ च्या माहितीनुसार, अविका एका एपिसोडसाठी १ ते २ लाख रुपये मानधन घेते.
अविका लहान वयात प्रचंड संपत्ती गोळा केली असून तिची एकूण संपत्ती 30 से 35 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.