वयाच्या २० वर्षी लग्न अन् घटस्फोट, २६ व्या वर्षीही तेच घडलं; दोन मुलींची आई आहे ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:20 IST2025-04-13T13:12:53+5:302025-04-13T13:20:17+5:30
अभिनेत्रीची एक मुलगी तिच्याजवळ राहते तर दुसरी पूर्व पतीसोबत राहते.

'बडे अच्छे लगते है' मालिकेत दिसलेली अभिनेत्री आठवतेय का? 'करले तू भी मोहोब्बत', 'नागिन','दिल से दिल तक' यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने साईड रोल्स केले.
ही अभिनेत्री आहे चाहत खन्ना. चाहतचं प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्यच जास्त चर्चेत राहिलं.
चाहतने २००६ साली भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. तेव्हा ती केवळ २० वर्षांची होती. लग्नानंतर वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.
पहिलं लग्न मोडल्यानंतर चाहतने २०१३ साली तिने फरहान मिर्जाशी प्रेमविवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर चाहतचं वैवाहिक जीवन सुखी होतं. चाहत आणि फरहानला दोन मुलीही झाल्या.
मात्र लग्नानंतर पाच वर्षांनी २०१८ मध्ये फरहानबरोबर घटस्फोट घेण्यासाठी तिने कोर्टात धाव घेतली. चाहतने तिच्या नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप लावला. गरोदरपणातही तिला त्रास दिल्याचा तिने दावा केला.
फरहान संशय घेत असल्याचं तिने सांगितलं होतं. त्याबरोबरच इच्छा नसतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो भाग पाडत असल्याचा खुलासाही तिने केला होता.
मुलींसाठी हे सगळं सहन करत असल्याचं चाहतने सांगितलं होतं. आता चाहतची एक मुलगी तिच्याजवळ राहते तर दुसरी मुलगी फरहानजवळ असते.