मित्रासोबत वन नाईट स्टँड, कोणालाही न सांगता अबॉर्शन; कायम वादात राहिलं अभिनेत्रीचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:11 IST2025-03-03T15:01:47+5:302025-03-03T15:11:53+5:30

'सेक्रेड गेम्स' सीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री, पुस्तक लिहून आयुष्यातली अनेक गुपितं उलगडली

'सेक्रेड गेम्स' या गाजलेल्या वेबसीरिजमधून कुब्रा सैत (Kubbra Sait) हे नाव अनेकांना ओळखीचं झालं. यामध्ये तिने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली. कुब्रा तिच्या अभिनयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ओटीटी विश्वात ती मोठा चेहरा आहे.

मात्र अभिनेत्री कुब्रा सैतचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादात राहिलं. २०२२ साली तिचं 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमॉयर' हे पुस्तक प्रकाशित झालं. यात तिने तिच्या आयुष्यातले अनेक गुपितं उलगडले.

काही दिवसांनी तिला आपण गरोदर राहिल्याचं कळलं. तिच्या या खुलाशानंतर खूप चर्चा झाली होती. नुकतंच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी एक आठवड्यानंतर अबॉर्शन करायचा निर्णय घेतला. मी यासाठी तयार आहे की नाही मला कळत नव्हतं."

मी अबॉर्शनबद्दल कोणालाच सांगितलं नाही. स्वत:च जाऊन करुन आले. खूप कमजोर झाले होते. मी कोणत्या परिस्थितीतून जात होते हे कोणालाच माहित नव्हतं.

याच पुस्तकात तिने आपल्या प्रेग्नंसी आणि अबॉर्शनचा खुलासा केला. वन नाईट स्टँड केलं आणि ती गरोदर राहिली होती. २०१३ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी ती अंदमानला ट्रीपवर गेली होती. तेव्हा नशेतच ती तिच्या एका मित्रासोबत इंटिमेट झाली.

पाच-सहा वर्षांनंतर मी एक ट्रॅव्हल शो करत होते. मला प्रचंड ब्लीडिंग होत होत. तेव्हा मला खूप घाम यायचा. मी खूप थकले होते. तरी मी दिग्दर्शकाला एकदाही त्याबद्दल सांगितलं नाही.

नंतर तिने हे सगळं पुस्तकात लिहिलं. त्यानंतर कुब्राला अनेकांनी याबद्दल विचारलं होतं. कुब्रा वयाच्या १७ व्या वर्षी लैंगिक अत्याचारालाही सामोरी गेली होती असाही खुलासा याच पुस्तकातून झाला होता.