ही शान कोणाची! अभिनेत्री श्रेया बुगडे 'लालबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 03:24 PM2024-09-15T15:24:43+5:302024-09-15T15:35:07+5:30

चला हवा येऊ द्या फेम मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे लालबागचा राजाच्या दर्शनाला गेली असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (shreya bugde, lalbagcha raja)

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गणेशोत्सवाचं नाव घेतलं की सगळीकडे लालबागचा राजाच्या जयघोष पाहायला मिळतो

लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी सामान्य नागरीकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असतात. बाप्पाच्या भक्तीत तल्लीन असतात

मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेने सुद्धा वेळात वेळ काढून लाडक्या लालबागचा राजाचं दर्शन घेतलंय. श्रेयाने दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

श्रेया बुगडेने लालबागचा राजाच्या चरणांवर डोकं ठेवत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे. श्रेयाने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. सध्या श्रेया ड्रामा ज्यूनियर्स कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय

श्रेया बुगडेच्या घरीही बाप्पा विराजमान असतो. श्रेया आणि तिचा पती निखिल सेठ बाप्पाची आराधना करुन पूजा करतात

श्रेया बुगडेच्या चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कधी हसवणार याची तिच्या चाहत्यांना आतुरता आहे. श्रेयाच्या विनोदी भूमिका चांगल्याच गाजल्या