company of love! नवऱ्यासोबत सोनाली कुलकर्णीचं सिजलिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:30 PM2021-10-31T19:30:00+5:302021-10-31T19:30:00+5:30

Sonalee kulkarni: दुबईमध्ये असलेल्या सोनालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

'गाढवाचं लग्न', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'हिरकणी' अशा एकाहून एक उत्तम चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

उत्तम अभिनय शैली आणि सौंदर्याच्या जोरावर सोनालीने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

७ मे रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्यासोबत दुबईत मोजक्या पाहुण्यांच्याउपस्थितीत लग्न केलं. विशेष म्हणजे कोणताही थाटमाट, जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाची माहिती सोनालीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिली होती.

चित्रपटांमुळे चर्चेत येणारी सोनाली गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. सध्या सोनाली तिच्या नवऱ्यासोबत दुबईत असून येथील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

मध्यंतरी सोनाली आणि कुणाल मालदीवला गेले होते. यावेळचे तिचे काही बोल्ड फोटो चर्चेत आले होते. त्यानंतर आता तिचे कुणालसोबतचे सिजलिंग फोटो चर्चेत आले आहेत.

दुबईमध्ये असलेल्या सोनालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसत असून कुणालदेखील कूल लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

सोनालीला फोटोशूट करण्याची विशेष आवड असून ती अनेकदा वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट करुन ते चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोनालीच्या फॅशन सेन्स आणि आऊटफिटची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. यावेळीदेखील तिने परिधान केलेला ड्रेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ( फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी फेसबुक पेज)