PICS : सोनाली कुलकर्णीचं धम्माल व्हॅकेशन, पतीसोबत या ठिकाणी करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:03 PM2021-08-03T13:03:43+5:302021-08-03T13:08:25+5:30

काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा ट्रिप एन्जॉय करतेय.

काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा ट्रिप एन्जॉय करतेय.

पती कुणालसोबत सोनाली मालदीवमध्ये व्हॅकेशनसाठी पोहोचलीये. या व्हॅकेशनचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

सी-प्लेनसमोरचे अनेक फोटो सोनालीने शेअर केले आहेत. या फोटोत ती धम्माल पोज देताना दिसतेय.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. फोटोत सोनाली कमालीची सुंदर दिसतेय.

सोनालीला भटकंती करायला आवडते. लग्नाआधी ती एकटीने फिरायची. पण आता नवºयासोबत ती तिची ही आवड पूर्ण करतेय.

काही महिन्यांपूर्वीच सोनालीने कुणालसोबत लग्नगाठ बांधली होती. दुबईत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

लग्नानंतर सोनाली व कुणाल पूर्व आफ्रिकेत हनीमूनसाठी गेले होते. इथले काही फोटोही तिने शेअर केले होते.

यानंतर लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात हे कपल दुबईतील एका अलिशान हॉटेलात पोहोचले होते.