"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:11 IST2025-04-09T11:58:44+5:302025-04-09T12:11:29+5:30
अभिनेत्रीला 'टीव्ही क्वीन' म्हणूनही संबोधलं जातं. ९ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत राहतेय लिव्ह इनमध्ये

एक मराठमोळी अभिनेत्री जिला टेलिव्हिजन क्वीनही म्हणतात तिला आईवडिलांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
मनोरंजनसृष्टीत अनेक असे कपल आहेत जे लग्न न करताच अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहत आहेत. हिंदीमध्ये तर हे कॉमनच आहे.
ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash). तेजस्वी अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशिपमध्ये आहे. बिग बॉसमधूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
तेजस्वी आणि करणमध्ये ९ वर्षांचं अंतर आहे. सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेजस्वीच्या आईनेच यावर्षी दोघं लग्न करतील असं सांगितलं.
तेजस्वीचे आईवडील तिच्यासाठी खूप प्रोटेक्टिव्ह आहेत. विशेषत: तिच्या आधीच्या ब्रेकअपनंतर त्यांनी तिला करणसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.
नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी म्हणाली,"माझ्या मागील ब्रेकअपनंतर माझे आईवडील म्हणाले की तू करणसोबत लिव्ह इन मध्ये राहा. कारण मी किती चंचल आहे हे त्यांना माहित आहे. पण ही काही पूर्ण लिव्ह इन रिलेशनशिप नाही"
"मी मुंबईकरच आहे आणि माझं मुंबईत एक घर आहे. त्यामुळे घराजवळ शूट असेल तर मी माझ्याच घरी राहते. काही काम असेल तरी मी माझ्या घरीच असते. "
"करणचं घर बांद्रामध्ये आहे आणि माझं गोरेगांवला आहे. माझं फिल्मसिटीत काम असेल तर मी त्याच्या घरी जाते. आम्ही दोघंही आईवडिलांसोबतच एकमेकांच्या घरी राहतो. करण माझ्या घरी माझ्या आईवडिलांसोबत असतो आमि मी त्याच्या घरी त्याच्या पालकांसोबत असते."
"आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत हे पाहून आमचे पालक खूश आहेत. माझ्या आईवडिलांनी तर थेटच सांगितलं की लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायला लागा. मलाही ते आवश्यक वाटतं. कारण लग्नाआधी सोबत राहिल्याने पार्टनरबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात."