Roshina Delavari : राखी सावंतच्या वादात आता आदिल खानच्या Ex गर्लफ्रेंडची एन्ट्री; म्हणाली, "हा आहे पुरावा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 04:14 PM2023-02-11T16:14:55+5:302023-02-11T16:31:37+5:30

Roshina Delavari And Rakhi Sawant : आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि म्हैसूरमध्ये राहते.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद आता वाढला आहे. राखीने तिच्या पतीविरुद्ध फसवणूक आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. शिवाय, आदिलने तिची फसवणूक करून तिच्याकडून दीड कोटी रुपये घेतल्याचेही तिने उघड केले, जे त्याने परत केले नाही.

राखीने आता खुलासा केला आहे की, आदिलचे निवेदिता (तनू) चंदेल या मुलीशी प्रेमसंबंध होते आणि तिच्याशी लग्न करण्यापूर्वी त्याचे लग्नही झाले होते. त्याच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल जाणून घेतल्यानंतर, अनेकांनी हे प्रकरण एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरीशी जोडलं आहे.

आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि म्हैसूरमध्ये राहते. रोशिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक नवीन पोस्ट केली आहे आणि स्पष्ट केले आहे की ती आदिलशी आता जोडली गेलेली नाही, त्याऐवजी, तिने आदिल खानला राखी सावंतसोबतच्या लग्नाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मजकूर पाठवला.

राखीला त्रास देणे थांबवण्यासही तिने सांगितले. Whatsapp वर त्यांच्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिले की, "हा पुरावा आहे." तिने पुढे लिहिले की, "राखी आणि आदिलचे लग्न झाले आहेत हे कळताच मी खूप जास्त आनंदी झाली आणि त्यांना एकत्र आनंदी राहण्यास सांगितले."

"मी भारतातील लोकांना विनंती करते की मला त्यांच्या जीवनात आणि समस्यांमध्ये गुंतवू नका कारण मला या प्रकरणाशी संबंधित बरेच मेसेज येत आहेत." आदिलसोबतच्या चॅटमध्ये रोशिना म्हणाली, माझा तुमच्या दोघांशी काहीही संबंध नाही, मी भारत सोडून जात आहे आणि मला माझे स्वतःचे आयुष्य आहे. प्लीज बायकोला सांगा सर मला एकटे सोडायला."

यापूर्वी जेव्हा राखी आणि आदिल रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा राखीने रोशिनाबद्दल खुलासा केला होता. रोशिनाने सांगितले की, राखी तिला सतत फोन करायची आणि तिला प्रियकर आदिलपासून दूर राहा असे सांगून त्रास द्यायची. रोशिना आणि राखीमध्ये काही ऑनलाइन भांडणे झाली होती पण नंतर सर्व काही शांत झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राखीने Etimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आदिलने माझे न्यूड व्हिडीओ बनवले आणि लोकांना विकले. माझे प्रकरण सायबर क्राइम विभागाकडे आहे. राखीने आदिलबद्दल असेही सांगितले की, तो तिसऱ्यांदा त्याची गर्लफ्रेंड तनूसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे.

गुरुवारी कोर्टात पोहोचलेल्या राखीने मीडियाला सांगितले की, "मी कोर्टात माझी बाजू मांडण्यासाठी आले आहे. आदिलला जामीन मिळालेला नाही. माझी मेडिकल टेस्ट झाली असून त्याचे पुरावेही मी पोलीस ठाण्यात सादर केले आहेत."

"आदिलने माझा छळ करून माझी फसवणूक केली आहे. त्याला जामीन मिळावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी माझे बँक स्टेटमेंट पोलिसांना दिले आहे. आदिलने माझा ओटीपी घेतला आणि माझे पैसेही चोरले, त्याने माझा विश्वास तोडला आहे."

दुसरीकडे राखीच्या वकिलांनी सांगितले की, आमच्याकडे असे गंभीर पुरावे आहेत की आदिलला जामीन मिळणार नाही. दीड कोटींची फसवणूक हा मोठा गुन्हा असून या प्रकरणाची न्यायालयातही चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे.

राखीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, आदिलने तिचे दागिने चोरले, पैसेही खाल्ले. राखीनेही तिच्या आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार धरले. मराठी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी आदिलला दहा लाखांचा चेक दिला होता, आईवर शस्त्रक्रिया करावी लागली, पण आदिलने ते पैसे आईच्या उपचारासाठी खर्च केले नाहीत, त्यामुळे आईचा मृत्यू झाला.

राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात खळबळ उडाली आहे. सातत्याने नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. राखीने पती आदिल खान दुर्रानी याच्यावर मारहाण आणि फसवणुकीचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले. यानंतरही आदिल खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत आहे.