Adnan Sami Shocking Transformation: हाच का तो?, अदनान सामीचं शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून यूजर्सना पडला प्रश्न By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:14 PM 2022-06-25T14:14:57+5:30 2022-06-25T14:48:45+5:30
Adnan Sami Shocking Transformation: एका यूजरने तर त्याच्या डायटिशियन आणि न्यूट्रिशनची माहिती विचारली आहे. गायकाचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल अवाक् लोक आश्चर्यचकित झाले होते. पण आता त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन व्यतिरिक्त, त्याची ग्रूमिंग पाहून लोक आणखी आश्चर्यचकित झाले आहेत. अदनानने बरेच वजन कमी करून स्वतःला स्लिम आणि फिट केलं आहे. दरम्यान आता त्याचे लेटेस्ट फोटो पाहून त्याला ओळखणे कठीण झाले आहे.
अदनान सामीने मालदीवच्या व्हेकेशनचे त्याचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाचा टी-शर्ट, एव्हिएटर सनग्लासेस, ट्रिम केलेला लूक असलेल्या अदनानने समुद्राजवळील स्वतःचा एक छान फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)
त्याचे हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिले- ' तुम्ही कोण आहात? दुसऱ्या यूजरने लिहिले- 'मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही....' एकाने अदनानचे कौतुक करताना लिहिले- 'लोक दिवसेंदिवस म्हातारे होत आहेत, पण अदनान सामी आता तरुण होतो आहे.' (Photo Instagram)
एका व्यक्तीने लिहिले - 'मला त्याचे डायटिशियन आणि न्यूट्रिशन जाणून घ्यायचे आहे. त्याने अप्रतिम काम केले आहे.(Photo Instagram)
अदनानचं हे ट्रांसफॉर्मेशन खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले आहेत. एकेकाळी आपल्या वजनामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या अदनानचे आज सगळेच कौतुक करतायेत..(Photo Instagram)
अदनान सध्या मालदीवमध्ये फॅमिली व्हॅकेशन एन्जॉय करतो आहे. (Photo Instagram)
अदनानने याआधीही त्याचे ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केले आहेत. काही लोकांनी त्याचे वजन कमी करण्यावर एडिटिंग म्हणून टीका केली होती. (Photo Instagram)