after chak de bad scripts ended my bollywood dream says vidya malavade
अन् बॉलिवूडचे स्वप्न भंगले...! सध्या काय करते ‘चक दे इंडिया’ फेम विद्या माळवदे? By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 08:00 AM2020-12-08T08:00:00+5:302020-12-08T08:00:01+5:30Join usJoin usNext ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील वुमन्स हॉकी टीमची कॅप्टन आठवते? 2007 साली आलेल्या ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील वुमन्स हॉकी टीमची कॅप्टन आठवते? होय, आम्ही बोलतोय ती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या माळवदे हिच्याबद्दल. विद्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. पण विद्याचे करिअरला याचा फार काही फायदा झाला नाही. आता ही विद्या काय करते तर फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडून योगा शिकवते. विद्याचे मानाल तर, सिनेमांची निवड चुकल्याने आणि सलग फ्लॉप सिनेमे दिल्याने तिचे करिअर संपुष्टात आले. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विद्या करिअर, पर्सनल लाईफबद्दल मनमोकळेपणाने बोलली. विद्या 12 वर्षांपासून योगा करतेय आणि गेल्या 6 वर्षांपासून तिने योगा शिकवणे सुरु केले आहे. 2000 मध्ये एका प्लेन क्रॅशमध्ये विद्याच्या पहिल्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर विद्या डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र योगाच्या मदतीने ती डिप्रेशनमधून बाहेर पडली. विद्या सांगते, ‘चक दे इंडिया’नंतर माझ्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते. या सिनेमानंतर नाना पाटेकर, संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्यासोबत सिनेमे आॅफर झाले खरे. पण त्याची स्क्रिप्ट खूप खराब होती. या सिनेमांतील भूमिकांनी माझे अख्खे करिअर संपले. 2008 मध्ये आलेल्या मंदीचा फटकाही तिला बसला. ती म्हणते, या मंदीमुळे सलग सिनेमे फ्लॉप झालेत आणि याचा माझ्या फिल्मी करिअरला मोठा धक्का बसला. मला आणखी फ्लॉप सिनेमे करायचे नव्हते. म्हणून मी अनेक सिनेमे नाकारले आणि डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले, असेही तिने सांगितले. विद्या एकेकाळी एअरहोस्टेस होती. 1997 मध्ये तिने पायलट कॅप्टन अरविंद सिंग बग्गासोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर तीनच वर्षांत तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर तीन वर्षांनी विद्याने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. 2003 मध्ये तिने ‘इंतेहा’ या सिनेमातून बॉलिवूड एन्ट्री केली होती. मात्र 2007 मध्ये रिलीज ‘चक दे इंडिया’ने तिला खरी ओळख दिली. यानंतर किडनॅप, बेनाम, तुम मिलो तो सही, नो प्रॉब्लम, दस तोला, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई अशा अनेक सिनेमांत तिने काम केले. 2009 मध्ये तिने संजय दयमासोबत दुसरे लग्न केले. संजयने २००१ साली प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.टॅग्स :विद्या माळवदेvidya malvade