वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या नारकर आजही दिसतात खूप ग्लॅमरस, पाहा त्यांचे साडीतले मनमोहक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:52 PM2022-12-16T18:52:54+5:302022-12-16T18:59:12+5:30

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

ऐश्वर्या नारकर 51 वर्षांच्या असल्या तरी त्यांच्या सौंदर्यांपुढे तरुणीदेखील फिक्क्या पडतील.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या बऱ्याचदा फोटो शेअर करत असतात.

नुकतेच त्यांनी लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

ऐश्वर्या नारकर लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहेत.

चाहतेही या फोटोंच्या प्रेमात पडले आहेत.

५१ वर्षीय ऐश्वर्या नारकर यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून ‘वय हा केवळ आकडा आहे’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

ऐश्वर्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अपराध, धड़क, अंकगणित या व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे

श्रीमंता घरची सून, दुहेरी,रेशीमगाठी,सोनपावले, या सुखांनो या,स्वामिनी, ये प्यार ना होगा कम,घर की लक्ष्मी बेटीयाँ या मालिकेतही त्यांनी काम केले आहे.