Ajay devgn and kajol anniversary when actress asked him for help with boyfriend problems
बॉयफ्रेडपासून पिच्छा सोडविण्यासाठी काजोलने मागितली होती अजय देवगणकडे मदत, अशी सुरु होती दोघांची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:42 PM2021-02-24T12:42:31+5:302021-02-24T14:51:31+5:30Join usJoin usNext अजय देवगन आणि काजोल बॉलीवूडच्या परफेक्ट कपलमध्ये आहेत. दोघांच्या लग्नाला 22 वर्ष झाले. 24 फेब्रुवारी 1999ला अजय देवगन आणि काजोल लग्नाच्या बेडीत अडकले. (Photo Instagram ) अजय देवगण आणि काजोलची पहिली भेट 1995 साली 'हलचल'सिनेमाच्या सेटवर झाली होती. 2014 साली एका मुलाखती दरम्यान काजोलने या सिेनेमाशी संबंधीत एका किस्सा सांगितला होता. (Photo Instagram ) “आम्ही एकत्र शूट करत होतो. त्या शॉटमध्ये मला अजय देवगणला कानशिलात लावायची होती, अजयला माझा हात खूप नाटकी पद्धतीने पकडायचा होता, ज्यामुळे मी त्याला कानशिलात मारु शकणार नाही. मला तो क्षण आठवतो, मी त्या वेळी स्वत: बद्दल विचार करत होतो "ओह माय गॉड". त्या आठवणी मला अचानक आल्या. मला समजले की हा माणूस माझ्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका साकारणार आहे. ' (Photo Instagram ) अजय देवगण आणि काजोल त्यावेळी दुसर्या कोणाला तरी डेट करत होते. इतकेच नाही तर काजोल अजय देवगणशी तिच्या बॉयफ्रेंडशी संबंधीत गोष्ट अजय देवगणला सांगायची. तो माझ्यासमोर गुरुजी किंवा बाबाजीसारखा बसला होता आणि मला सल्ला देते होता की मला काय करायला हवं आणि काय करायला नको. (Photo Instagram ) अजय देवगण आणि काजोलने दोन वर्षानंतर एकमेकांना डेटिंग करण्यास सुरुवात केली. (Photo Instagram ) दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना मीडियाचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. (Photo Instagram ) त्यांनी घराच्या छतावरच छुप्या पद्धतीने लग्न केले. ज्यामध्ये घरातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (Photo Instagram ) अजय आणि काजोलला दोन मुलं आहेत मुलगी न्यासा आणि मुलगा युग.(Photo Instagram ) टॅग्स :काजोलअजय देवगणKajolAjay Devgn