Ajay Devgn bought the first electric car bmw i7 electric luxury sedan; Know About price and features
अजय देवगणनं खरेदी केली पहिली इलेक्ट्रिक कार; किंमत अन् फिचर्स ऐकून थक्क व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 09:28 AM2023-05-30T09:28:40+5:302023-05-30T09:40:05+5:30Join usJoin usNext तुम्ही बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला चित्रपटांमध्ये कार आणि बाईकसोबत स्टंट करताना पाहिले असेल. खऱ्या आयुष्यातही त्याला कारची खूप आवड आहे. त्याची पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा देवगण देखील अनेकदा आलिशान कारमध्ये दिसतात. सध्या बहुतांश ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आहे. त्यात आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शक अजय देवगणनेही इकोफ्रेंडली होण्याचं ठरवले आहे. अजय इलेक्ट्रीक कारच्या प्रेमात पडला आहे. जेव्हा संपूर्ण जग हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे, तेव्हा अजय देवगणने स्वतःसाठी एक इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. भोला आणि सिंघम स्टारने BMW i7 ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान खरेदी केली आहे, ज्याची एक्स शोरुम किंमत १.९५ कोटी रुपये आहे. ही इलेक्ट्रिक सेडान ट्वायलाइट पर्पल पर्ल मेटॅलिक कलरमध्ये उपलब्ध आहे. BMW ची ही इलेक्ट्रिक सेडान लक्झरी लुक आणि वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. मर्सिडीज-बेंझ EQS 580, Porsche Taycan आणि Audi e-tron GT सारख्या लक्झरी इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करते. BMW i7 बद्दल बोलायचे तर, ऑल-इलेक्ट्रिक लक्झरी फ्लॅगशिप सेडानला कंपनीच्या सिग्नेचर ग्रिल्स मिळतात. त्याचे डिझाईन फ्यूचरिस्टिक आहे. स्पोर्टिंग ब्लू हायलाइट्स आणि नवीन अॅलॉय व्हील्स तसेच 'i' इनसिग्निया, इलेक्ट्रिक सेडानला इंफोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या दोन्हीवर कर्व्ड स्क्रीन मिळतात. जी अनुक्रमे १२.३-इंच आणि १४.९-इंच आहे. इलेक्ट्रिक सेडानला BMW ची iDrive 8 ऑपरेटिंग सिस्टम तसेच केबिनमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी Amazon Fire TV सपोर्टसह ३१.३-इंच 8K सिनेमा स्क्रीन मिळते, जी रुफला जोडलेली असते आणि खाली दुमडली जाऊ शकते. मागील दरवाज्यात इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच तापमान आणि आसन नियंत्रणासाठी 5.5-इंच टचस्क्रीन समाविष्ट आहे. BMW i7 101.7kWh लिथियम-आयन बॅटरी लावण्यात आली आहे जी एका चार्जवर ५९१ ते ६२५ किमीची रेंज देऊ शकते. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स लावण्यात आल्यात. ज्या 544 hp पॉवर आणि 745 Nm पीक टॉर्क जनरेट करतात. i7 चा कमाल वेग २३९ kmph आहे आणि ती फक्त ४.७ सेकंदात ०-१०० kmph चा वेग पकडते. ही इलेक्ट्रिक सेडान वेगवान चार्जरच्या मदतीने केवळ ३४ मिनिटांत १०-८०% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल, डिझेलच्या कारचा खप सर्वाधिक होता. हळूहळू एलपीजीवीरल कार आल्या. नंतर त्यांची जागा सीएनजीवरच्या कारनी घेतली. तरी देखील लोक पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या कार घेत होते. दोन-तीन वर्षांपूर्वी पेट्रोल, डिझेलच्या किंमती दुप्पटीने वाढल्या आणि इलेक्ट्रीक कारची एन्ट्री झाली आणि सगळी समिकरणेच बदलून गेली. इलेक्ट्रीक कारसाठी तुम्हाला १३ लाख रुपयांपासून ते २०-२५ लाखांपर्यंत पैसे मोजावे लागताहेत. आता कोट्यवधीच्याही इलेक्ट्रिक कार बाजारात आल्या आहेत. टॅग्स :अजय देवगणइलेक्ट्रिक कारAjay DevgnElectric Car