PHOTOS : अग्गं बाई हे काय? आलियाचा बलून ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली ढोबळी मिरची, अशी उडवली खिल्ली...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:01 PM 2022-07-25T17:01:34+5:30 2022-07-25T17:12:35+5:30
Alia Bhatt at Darlings Trailer Launch Event : सोमवारी आलिया भट ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विशेषत: तिच्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली. सोमवारी आलिया भट ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विशेषत: तिच्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली.
आलिया प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीची घोषणा केली तेव्हा आलिया लंडनमध्ये होती. त्यानंतर ती भारतात परतली पण फार कुठे दिसली नव्हती.
आज पहिल्यांदा ती पब्लिकली दिसली आणि ती सुद्धा एका वेगळ्या स्टाईलमध्ये. आलियाने पिवळ्या रंगाचा शॉर्ट बलून स्टाइल ड्रेस कॅरी केला होता.
बेबी बम्प लपवण्यासाठी आलियाने जाणीवपूर्वक या ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसमध्ये तिने तिचा बेबी बम्प चतुराईने लपवला. पण तरिही लोकांनी तिची खिल्ली उडवलीच.
होय, आलियाचा शॉर्ट बलून स्टाईल ड्रेस पाहून सोशल मीडिया युजर्सनी मजेशीर कमेंट्स दिल्यात. यातल्या काही कमेंट्स चांगल्याच फनी आहेत.
आलिया, पिशवी का घातलीस? अशी कमेंट एका युजरने केली. तर पॉली बॅग इंडियात बॅन आहेत, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.
काहींना तिचा हा ड्रेस पाहून लेजच्या पाकिटाची आठवण झाली. तर काहींना रेनकोट आठवला. तर काहींना चक्क पिवळी शिमला मिर्ची आठवली.
काहींनी तिला हाय हिल्स न घालण्याचा सल्ला दिला. प्रेग्नंसीमध्ये हे बरं नव्हे, असं अनेकांनी तिला आवर्जुन सांगितलं.
‘डार्लिंग्स’ हा चित्रपट आलियाने को-प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात ती अभिनय करताना देखील दिसणार आहे. येत्या ५ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.