Alia Bhatt : आलिया भटनं घेतला मोठा निर्णय, लवकरच बदलणार नाव, खास आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 10:42 AM2022-08-21T10:42:59+5:302022-08-21T10:49:39+5:30

Alia Bhatt : आलिया बाळाच्या आगमनासाठी सज्ज आहे. पण त्याशिवाय आलियाने आणखी एक तयारी केली आहे. होय, आलिया लवकरच आपलं नाव बदलणार आहे आणि यामागचं कारण अगदीच खास आहे.

आलिया भट सध्या आपली प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. होय, लवकरच रणबीर कपूर व आलिया भट या दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. साहजिकच अख्खं कपूर कुटुंब बाळाची प्रतीक्षा करत आहे.

बाळाच्या आगमनासाठी आलिया सज्ज आहे. पण त्याशिवाय आलियाने आणखी एक तयारी केली आहे. होय, आलिया लवकरच आपलं नाव बदलणार आहे आणि यामागचं कारण अगदीच खास आहे.

होय, आलियाने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अरे..अरे...घाबरू नका. आलिया तिचं संपूर्ण नाव बदलणार नसून फक्त तिच्या नावासमोर आता कपूर हे सासरचं आडनाव लागणार आहे.

होय, येणाºया काळात आलिया भट ही आलिया भट कपूर या नावानं ओळखली जाईल. खुद्द आलियाने एका मुलाखतीत हा खुलासा केला.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मी आता कपूर कुटुंबाची सदस्य झाले आहे. त्यामुळे मी आता माझं नाव ऑफिशिअली आलिया भट कपूर करणार आहे.

नावातील हा बदल मला आनंद देणारा असेल. आता आमचा बेबी येणार आहे. आता मला भट राहायचे नाही. कपूर आता एकत्र राहतील...माझ्या म्हणण्याचा अथ तुम्हाला कळला असेलच, असंही ती म्हणाली.

मला कपूर घराण्याचा सदस्य म्हणून वावरायचं आहे. मला त्यांच्यापासून वेगळं राहायचं नाही. मी नेहमी आलिया भट असेल. पण आता मी कपूरही आहे. मी पासपोर्टवरचं नावही बदलणार आहे, असं ती म्हणाली.

लग्नानंतर लगेच मला नाव बदलायचं होतं. पण सतत बिझी असल्यामुळे आणि सतत विदेश प्रवास सुरू असल्यामुळे हे शक्य झालं नाही, असंही ती म्हणाली.

आलिया व रणबीरने याचवर्षी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोनच महिन्यात आलियाने ती आई बनणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

आलिया व रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया व रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.