आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:07 IST2024-12-26T10:51:54+5:302024-12-26T11:07:50+5:30
ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कुटुंबीय एकत्र जमले होते.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी ख्रिसमस साजरा केला. Christmas Celebrationचे काही फोटो समोर आले आहेत.
कपूर आणि भट दोन्ही कुटुंबाकडे खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रणबीर आणि आलिया कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना पाहायला मिळाले
या फोटोत संपुर्ण कपूर कुटुंब दिसून येत आहे. कपूर कुटुंबाच्या पार्टीत महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्तय नंदादेखील सहभागी झाला होता.
कपूर कुटुंबच्या ख्रिसमस पार्टीमध्ये आलियाने लाल रंगाच्या ड्रेस परिधान केला होता.
आलिया या लूकमध्ये अगदी सुंदर दिसत होती.
फोटोसाठी यावेळी तिनं काही खास पोझही दिल्या. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला.
कपूर कुटुंबासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते.
आलियाने तिची आई सोनी राजदान व बहिण शाहीनबरोबरचा पार्टीतला फोटो शेअर केला आहे.
यावेळी आलिया पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तर डोक्यावर सांता हेअरबँड लावला होता.तर तिची बहिण शाहीन हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फोटोत दोघींमधील खास बॉन्डिंग पाहायला मिळतेय.
अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी चाहते अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत.