कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 12:34 PM 2022-11-07T12:34:21+5:30 2022-11-07T15:48:04+5:30
आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.यासगळ्यात आता चर्चा होतेय ते दोघांच्या नेटवर्थची. Alia Bhatt and Ranbir Kapoor : कपूर कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. होय, आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूर ( Ranbir Kapoor)आईबाबा झाले आहेत. आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. (फोटो इन्स्टाग्राम)
बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही गोड बातमी ऐकून चाहतेही क्रेझी झाले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. (फोटो इन्स्टाग्राम)
यासगळ्यात आता चर्चा होतेय ते दोघांच्या नेटवर्थची. जाणून घेऊया दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत आहे ते..(फोटो इन्स्टाग्राम)
आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात.(फोटो इन्स्टाग्राम)
बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये आलियाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आतापर्यंत आलियाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
रणबीरदेखील लोकप्रिय अभिनेता असून तो असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं म्हटलं जातं. रणबीरने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
सूत्रांच्या माहितीनुसार, २०२१ पर्यंत आलियाकडे १६२ कोटी रुपये संपत्ती होती. आलिया प्रत्येक महिन्याला ६० लाखांची कमाई करते.(फोटो इन्स्टाग्राम)
एका चित्रपटासाठी आलिया ८- १० कोटी रुपये मानधन घेते. तसंच जाहिराती, ब्रँड प्रमोशनमधूनही ती पैसे कमवते.(फोटो इन्स्टाग्राम)
रणबीर कपूरची २०२१ पर्यंतची संपत्ती ३३० कोटी रुपये होती. तो एका चित्रपटासाठी ७-८ कोटी रुपये मानधन घेतो.(फोटो इन्स्टाग्राम)
रणबीर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड इंडोर्समेंटमधून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई करतो.(फोटो इन्स्टाग्राम)
रणबीर आणि आलियामध्ये रणबीर जास्त श्रीमंत आहे. तसंच त्याच्याकडे अनेक महागड्या लक्झरी कारचं कलेक्शनही आहे.