Alia Bhatt's Weight Loss Journey : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटनं कसं घटवलं वजन ?, अभिनेत्रीनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 05:37 PM2023-04-27T17:37:05+5:302023-04-27T17:45:54+5:30

Alia Bhatt's Weight Loss Journey : आलिया भटनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेग्नेंसीनंतर कशा प्रकारे वजन कमी केले हे सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (alia Bhatt) ही सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे.

आलिया भटने लेक राहाला सी सेक्शनच्या मदतीने जन्म दिला. त्यानंतर आलियाचे खूप वजन वाढले होते. आता अचानक आलियाला पुन्हा एकदा फिट पाहून चाहते थक्क झाले.

अनेकांनी असे म्हटले की आलियाने सर्जरी करत वजन कमी केले आहे. अशा सगळ्या कारणांमुळे आलिया पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने याबाबत खुलासा केला आहे.

आलिया भटने नुकतेच व्हॉग इंडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने कशा प्रकारे वजन कमी केले. इतकंच काय तर तिने कोणत्याही सर्जरीच्या मदतीने हे केले नसल्याचे सांगितले.

यासोबतच आलिया सध्या राहाला ब्रेस्टफिडींग करत असल्यामुळे तिची अक्कल दाढही काढू शकत नाही. त्यासोबतच ती अॅनेस्थेशिया घेऊ शकत नाही असे म्हटले.

तर अनेकांना वाटते की मी माझे वजन कोणत्या अननॅच्यूरल पद्धतीने कमी केले आहे पण सत्य हे आहे की मी माझी अक्कल दाढ सध्या काढू देखील शकत नाही. कारण मी राहाला ब्रेस्टफिडींग करते आणि मी अॅनेस्थिशिया घेऊ शकत नाही.

तर वजन कमी करण्यासाठी ती आठवड्यातील ६ दिवस वर्कआऊट आणि डाएटचे काटेकोरपणे पालन करते.

आलियाने खुलासा केला की तिची सासू म्हणूजेच नीतू कपूर यांनी तिच्यासाठी डिंकाचे लाडू बनवले होते. जे तिने सहा आठवडे खाल्ले. लोकांना कळायला हवे की प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणे याचा अर्थ तुम्ही खूप खाता असे नाही. त्याचे कारण म्हणजे तुमच्यासोबत जी व्यक्ती मोठी होत आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

पण तुमचे जे वजन आहे ते आपल्या बिएमआय प्रमाणे योग्य असायला हवे. तुम्ही एखाद्या प्रोफेश्नल व्यक्तीशी यावर चर्चा करायला हवी, पण तुम्ही काही प्रमाणात वजन घेत वर्कआऊट करण योग्य आहे.

प्रेग्नेंसीच्या १२ आठवड्यानंतर हेवी वर्कआऊट करण्यास सुरुवात करावी असा सल्ला तिच्या डॉक्टरांनी दिल्याचे आलियाने पुढे सांगितले.

प्रेग्नेंसीआधी जितके वर्क-आऊट किंवा मग जितके वेट ती घ्यायची तिथवर पोहोचायला तिला अजून वेळ आहे. आलिया ही साधारण रुटिन फॉलो करते रोज १५ मिनिटं वॉक आणि ब्रिदिंग एक्सर्साईज करते.