सुsssपर!! ‘माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल’, म्हणत आलियाने शेअर केले फोटो; पाहा तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 02:13 PM2022-01-07T14:13:02+5:302022-01-07T14:42:31+5:30

Alia Bhatt PICS : या फोटोत आलिया कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या गालावरची खळी, ओठांवरचं हास्य सगळं काही झक्कास आहे.

आलिया भट व रणबीर कपूर हे लव्हबर्ड्स नुकतेच जंगल सफारीवर गेले होते. पण या जंगल सफारीचे सुंदर फोटो आता समोर आले आहेत.

होय, आलियाने काही फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत आणि या फोटोंसाठी तिने तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरला क्रेडिट दिलं आहे.

माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल, असं म्हणत आलियाने स्वत:चे काही गोड फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोत आलिया कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या गालावरची खळी, ओठांवरचं हास्य सगळं काही झक्कास आहे.

आलिया व रणबीर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.

यातला एक फोटो आलियाने क्लिक केला आहे. यात रणबीरच्या हातात कदाचित चहाचा पेला आहे.

जंगल सफारीदरम्यानचे काही वन्यप्राण्यांचे फोटोही आलियाने शेअर केले आहेत.