आता यांचीच चलती...! साऊथमधील या हिरोंचं एका सिनेमाचं मानधन वाचून बॉलिवूड हिरोंनाही येईल भोवळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 03:23 PM 2022-04-07T15:23:32+5:30 2022-04-07T15:34:50+5:30
South Indian Highest Paid Actors : अल्लू अर्जुन असो, यश असो, थलापती विजय असो की रामचरण- ज्युनिअर एनटीआर असो... सध्या यांचाच बोलबाला आहे. यांची फी सुद्धा कमी नाही... बाहुबली फेम प्रभासचे बॅक टू बॅक दोन सिनेमे फ्लॉप गेलेत. पण त्याची क्रेझ कमी झालेली नाही. एका सिनेमासाठी प्रभास 150 कोटी घेऊ शकतो, यावर विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे ‘आदिपुरूष’ या सिनेमासाठी त्याने 150 कोटी मानधन घेतलं आहे आणि याचसोबत तो भारताचा हायेस्ट पेड अॅक्टर बनला आहे.
तामिळचा सुपरस्टार धनुषची अॅक्टिंग जबरदस्त आहे. बॉलिवूडच्या सिनेमातही त्याची जबरदस्त अॅक्टिंग तुम्ही बघितलीच असेल. रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी धनुष 20 ते 25 कोटी चार्ज करतो.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. यानंतर साऊथमध्ये अल्लूचीच हवा आहे. ‘पुष्पा’साठी अल्लू अर्जुनने 50 कोटी फी घेतली होती. ‘पुष्पा’ ब्लॉकबस्टर झाल्यानंतर अल्लूने त्याच्या मानधनात वाढ केल्याचं कळतंय.
‘सिंघम’ स्टार सूर्याचे असंख्य चाहते आहेत. साऊथमध्ये त्याची तगडी फॅन फॉलोइंग आहे. एका चित्रपटासाठी सूर्या 35 ते 45 कोटी घेतो. सूर्याच्या ‘जयभीम’ या चित्रपटाचं जोरदार कौतुक झालं होतं. यात सूर्या वकीलाच्या भूमिकेत दिसला होता.
केजीएफ-चॅप्टर 1 या सिनेमानंतर सुपरस्टार यशचा ‘केजीएफ- चॅप्टर 2’ येत्या 14 एप्रिलला चित्रपटगृहांत धडकणार आहे. या सिनेमासाठी यशने 30 कोटींची रक्कम वसूल केली आहे.
अजित कुमार हा साऊथचा गुणी अभिनेता. साऊथमध्ये अजित कुमारवर चाहते अक्षरश: जीव ओवाळतात. चर्चा खरी मानाल तर निर्माता बोनी कपूरच्या तीन चित्रपटांसाठी अजित कुमारने 120 कोटी चार्ज केले आहेत. एके62 या आगामी चित्रपटासाठी त्याने 105 कोटी घेतल्याचीही चर्चा आहे.
रजनीकांत हे तर साऊथ सिनेप्रेमींसाठी गळ्यातील ताईत. रजनीकांत यांना साऊथचे लोक अगदी देवासारखे पूजतात. रिपोर्टनुसार, रजनीकांत एका सिनेमासाठी 110 कोटी घेतात.
थलापति विजयचा ‘बीस्ट’ हा सिनेमा येत्या 13 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. रिलीजआधीच या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी विजयने 100 कोटी घेतल्याची चर्चा होती.
ज्युनिअर एनटीआर व रामचरण ही जोडी ‘आरआरआर’ नंतर चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमात या जोडीनं अक्षरश: जीव ओतला. या चित्रपटासाठी या दोघांनी प्रत्येकी 45 कोटी फी घेतल्याचं कळतंय.