अमृता खानविलकर अभिनेत्री नसते तर या क्षेत्रात असती कार्यरत, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:50 PM2023-02-21T12:50:44+5:302023-02-21T12:58:33+5:30

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने अभिनय क्षेत्रात चांगलेच नाव कमावले आहे. अमृता अभिनेत्री नसती तर ती कोण असती हे तिने सांगितले.

आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील तिने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे.

अमृता खानविलकरने अभिनय क्षेत्रात चांगलेच नाव कमावले आहे. अमृता अभिनेत्री नसती तर ती कोण असती हे तिने सांगितले.

अमृता खानविलकर विविध माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिचे फॅन फॉलोईंग खूप मोठे आहे.

अमृता खानविलकर अभिनय क्षेत्रात नसती तर तिने कुठल्या क्षेत्रात काम केलं असते हे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितलं.

अमृता खानविलकर म्हणाली, आतापर्यंत मला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण जर मी अभिनेत्री नसते तर मी एक फिटनेस ट्रेनर किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणजेच डान्स ट्रेनर असते. आता तिच्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

अमृता खानविलकर फिटनेस फ्रिक देखील आहे. ती नियमितपणे व्यायाम करते, त्याचप्रमाणे तिच्या आहाराकडे ही व्यवस्थित लक्ष देत असते.

अभिनयाबरोबरच अमृता खानविलकर उत्कृष्ट नृत्यांगना आहे हे देखील आपल्या सर्वांनाच माहित आहे.

काही महिन्यांपूर्वी ती झलक दिखला जा शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि तिच्या नृत्याचे माधुरी दीक्षितनेही भरभरून कौतुक केले होते.

अमृता खानविलकरचे इंस्टाग्रामवर ३.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

अमृता खानविलकर शेवटची चंद्रमुखी चित्रपटात झळकली.