अमृता खानविलकरच्या लेहंग्यात मनमोहक अदा, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 09:56 IST2024-12-13T09:41:42+5:302024-12-13T09:56:24+5:30
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
अमृता खानविलकरने मराठीतच नाही तर हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
अमृता खानविलकर अलिकडे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटात झळकली आहे.
यात अमृताने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला आणि चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसली.
अमृता खानविलकरने नुकतेच लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
अमृताने लेहंग्यावर कमी मेकअप, मोठे कानातले, हातात बांगड्या आणि केस मोकळे सोडले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
अमृताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.