'बालिका वधू' मालिकेतील आनंदी आता दिसते खूप वेगळी, ग्लॅमरस फोटोंमुळे येते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 20:20 IST2021-06-22T20:09:22+5:302021-06-22T20:20:26+5:30
बालिका वधू फेम अविका गौर बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते.

छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू'मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अविका गौर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.
अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला आकर्षित करेल. प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अविका गौर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
अविका गौर तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते.
बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली.
मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते.
या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.