बिकनीमध्ये जलवा दाखविल्यानंतर राधिका आपटे दिसली कॅज्युअल लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 17:00 IST2019-05-01T16:58:16+5:302019-05-01T17:00:39+5:30

अभिनेत्री राधिका आपटे काही दिवसांपूर्वी बिकनीमधील फोटोंमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता ती मुंबईती जुहू येथे डिनर नंतर कॅज्युअल लूकमध्ये पहायला मिळाली.

राधिका लवकरच ब्रिटीश अमेरिकन अॅक्शन थ्रिलर द वेडिंग गेस्ट व इंग्लिश सिनेमा द आश्रममध्ये दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ती सेक्रेड गेम्स 2मध्येदेखील दिसणार आहे. ही सीरिज 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सेक्रेड गेम्स 2मध्ये राधिका आपटेसोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राधिकाचा अंधाधुन चित्रपट चीनमध्ये नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

2018 साली राधिका पॅडमॅन, लस्ट स्टोरिज, अंधाधुन व बाजार यांसारख्या चित्रपटात दिसली होती.