अनुपम खेर यांची पहिली पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दोन घटस्फोटानंतर आता जगतेय एकाकी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:46 AM2023-12-12T09:46:04+5:302023-12-12T09:49:24+5:30

Anupam Kher : अनुपम खेर यांचे पहिले लग्न १९७९ मध्ये झाले होते. हा त्यांचा प्रेमविवाह होता. मात्र, त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही आणि नंतर दोघेही वेगळे झाले.

अनुपम खेर यांचे पहिले लग्न १९७९ मध्ये झाले होते. हा त्यांचा प्रेमविवाह होता. त्यांनी आणि त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांच्या पालकांना लग्नासाठी मनवले आणि नंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून उत्तीर्ण होताच लग्न केले. मात्र, त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही आणि नंतर दोघेही वेगळे झाले.

अनुपम खेर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मधुमालती कपूर आहे. मधुमालतीपासून वेगळे झाल्यानंतर अनुपम खेर किरण यांच्या प्रेमात पडले. किरण देखील आधीच विवाहित होत्या आणि त्यांचा नवरा व्यापारी होता. सिकंदरच्या जन्मानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण झाले होते, त्यामुळे त्या खूप नाराज होत्या.

अनुपम खेर आणि किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न केले होते. त्याचवेळी मधुमालती कपूर अभिनयात करिअर करण्यात व्यस्त होत्या. अनुपम खेर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर मधुमालती यांनी लेखक-दिग्दर्शक रणजित कपूर यांच्याशी लग्न केले.

मधुमालती कपूर आणि रणजीत कपूर यांचे लग्नही फार काळ टिकले नाही. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर मधुमालती यांनी लग्न केले नाही. आता त्या एकट्याच राहतात.

मधुमालती कपूर याही किरण खेर यांच्यासारख्या गुणी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्या शेवटच्या 'ब्रह्मास्त्र : पार्ट वन'मध्ये दिसल्या होत्या. त्यांनी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'सोनू की टीटू की स्वीटी' आणि 'गदर: एक प्रेम कथा'मध्येही काम केले.

मधुमालती या चित्रपट विश्वातही सक्रिय आहेत. त्या शेवटच्या 'ब्रह्मास्त्र: द शिवा'मध्ये दिसली होती. मधुमालती सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांचा कल धर्म आणि अध्यात्माकडे वाढला आहे.