IN PICS : विरूष्काची लेक वामिकाला शाहरूख-सलमानने दिले ‘लयभारी’ गिफ्ट, लाखांत आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 05:20 PM2021-02-05T17:20:33+5:302021-02-05T17:30:13+5:30

कतरिना, दीपिकानेही पाठवली ही सुंदर भेट

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली यांची लेक वामिका सध्या जाम चर्चेत आहे. विरूष्काने वामिकाचा एक फोटो शेअर केल्यापासून तर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. वामिकासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी महागडे गिफ्ट पाठवली आहेत.

शाहरूख व गौरी खान यांनीही वामिकाला एक गोड भेट दिली आहे. अनुष्काच्या लेकीसाठी शाहरूख व गौरीने एक डायमंड ब्रेसलेस पाठवले आहे. अनुष्काने शाहरूखच्याच रब ने बना दी जोडी या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. दोघेही खूप चांगले मित्र आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, सुपरस्टार सलमानने विरूष्काच्या लेकीसाठी एक सुंदर डॉल हाऊस गिफ्ट म्हणून पाठवले आहे. याची किंमत 1 लाख रूपये असल्याचे सांगितले जातेय.

आमिर खानने अनुष्का व विराटची मुलगी वामिकासाठी गोल्डल प्लेटेड क्रैडल अर्थात बेबी बेड शिवाय बुके पाठवल्याचे कळतेय. या बेडची किंमत 1.70 लाख रूपये आहे.

रणवीर सिंग व दीपिका पादुकोणने वामिकाला सोन्याची चेन गिफ्ट म्हणून दिल्याचे कळतेय. याची किंमत 1.80 लाख रूपये आहे.

ऐश्वर्याने वामिकासाठी नाही पण तिच्या मॉम डॅडसाठी खूप महागाचे हँडमेड चॉकलेस पाठवल्याचे समजतेय.

कतरिना व अनुष्का दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. कॅटने अनुष्काच्या बेबीसाठी डॉल हाऊस पाठवल्याचे कळतेय. याची किंमत 70 हजार असल्याचे कळतेय.

अक्षय कुमारने वामिकाला सोन्याचे चाळ भेट दिले आहेत. अक्षय कुमार व अनुष्का दोघांचीही जुनी मैत्री आहे.