PHOTOS: सिनेमांमध्ये मला शो-पीस बनायचं नव्हतं म्हणून...., मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्माचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 06:00 AM2021-03-10T06:00:00+5:302021-03-10T06:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अनुष्काने या दरम्यान निर्माता म्हणून काम करणे सुरूच ठेवले आहे. (Photo Instagram)

अनुष्काने अगदी लहान वयातच चित्रपट निर्माता होण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एनएच 10, फिल्लौरी आणि पाताल लोक सारख्या सुपरहिट चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती केली आहे. आता अनुष्काने स्वत: स्पष्ट केले आहे की तिने निर्माते होण्याचे का ठरविले.

अनुष्का म्हणाली, 'मला वाटते की मला याची जाणीव आहे की मी चित्रपट आणि पात्रांची निवड करताना अशी केली पाहिजे ज्यामुळे स्त्रियांना पडद्यावर दाखविण्याची पद्धत बदलेल. (Photo Instagram)

निर्मातीपेक्षा अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी खूप आत्मविश्वासाची आवश्यकता आहे कारण, आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावं लागतं आणि स्त्रियांना पडद्यावर दाखविण्याच्या सामान्य प्रथेला आव्हान द्यावे लागते. ' (Photo Instagram)

निर्माता होण्यापूर्वीच अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी, पीके, एनएच 10, सुई धागा आणि झिरो सारख्या चित्रपटांद्वारे खूप सशक्त महिलांची भूमिका केली. (Photo Instagram)

गेल्या 11 जानेवारीला अनुष्का शर्माने मुलगी वामिकाला जन्म दिला आणि आता ती पूर्णपणे आपल्या मुलीची काळजी घेत आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनुष्का मॉडेल होती. मॉडेलिंगपासून सुरू झालेला अनुष्काचा प्रवास बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला. (Photo Instagram)

वयाच्या १५ व्या वर्षांपासून अनुष्काने आपल्या मॉडेलिंगची सुरूवात केली होती. यानंतर पाच वर्षे ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात होती. (Photo Instagram)

पाच वर्षे स्ट्रगल केल्यानंतर अनुष्काला पहिला चित्रपट मिळाला. विशेष म्हणजे, पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. (Photo Instagram)