बोल्डनेसच्या सीमा पार करणाऱ्या या अभिनेत्रीलाही बॉडी शेमिंगचा करावा लागला सामना, आज हॉटनेसमुळे ओळखली जाते!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:04 PM2023-03-14T15:04:58+5:302023-03-14T15:16:52+5:30

Anveshi Jain : आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत साऊथ आणि ओटीटीवरील पॉप्युलर अभिनेत्रीबाबत, जी स्वत:च्या बॉडीवर नाराज होती.

Anveshi Jain on body shaming: एकीकडे बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचचा विषय नेहमीच चर्चेत असतो तर दुसरीकडे अभिनेत्रींसाठी बॉडी शेमिंगचाही मुद्दा त्रासदायक असतो. अनेकींना कॉलेजच्या जीवनात बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. काहींना सिनेमात आल्यावर बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला तर काहींना कॉलेज आणि स्ट्रगलच्या दिवसात करावा लागला. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत साऊथ आणि ओटीटीवरील पॉप्युलर अभिनेत्रीबाबत, जी स्वत:च्या बॉडीवर नाराज होती.

आपल्याच शरीराचा राग करणारी दुसरी तिसरी कुणी नसून आजची पॉप्युलर अभिनेत्री अन्वेषी जैन आहे. तुम्ही विचार करत असाल की, तिची फिगर तर कमाल आहे. पण चला जाणून घेऊ तिच्यासोबत काय झालं होतं.

वेब सीरिज 'गंदी बात' (Gandi Baat) फेम अभिनेत्री अन्वेषी जैन (Anveshi Jain)ला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने या वेबसीरिजमध्ये बोल्डनेसच्या सगळ्या सीमा पार केल्या होत्या. तेव्हा तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं होतं. आता ती ओटीटीसोबत सिनेमातही काम करत आहे.

अन्वेषी आज भलेही आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिला सोशल मीडियावर 6 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. लोक तिच्या अदांवर फीदा असतात. पण तिलाही एकेकाळी बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता.

हे तेव्हा घडलं होतं जेव्हा ती कॉलेजमध्ये होती. तिला तिच्या शरीरावरून टोमणे मारले जात होते. तिने याचा खुलासा स्वत: इन्स्टा अकाऊंटवरून केला होता. तिला कॉलेजमध्ये बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता.

अन्वेषीनुसार, कॉलेजच्या दिवसात एक अशी वेळ आली होती जेव्हा तिला तिच्याच शरीराच राग येत होता. पण नंतर तिला जाणीव झाली की, तिने शरीराचा राग न करता त्यावर प्रेम केलं पाहिजे.

'गंदी फेम' अभिनेत्रीनुसार, अन्वेषीचं मत आहे की कुणालाही आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी कुणालाही हॉट किंवा बोल्ड असण्याची गरज नाही. कुणीही स्वत:ला तसंच ठेवावं जसे ते आहेत.

अन्वेषी आज साऊथ सिनेमांमध्ये काम करत आहे. अनेक सिनेमात तिने आयटम नंबर केले. शेवटी ती रवि तेजाचा सिनेमा 'राम राव ऑन ड्यूटी' मध्ये आइटम नंबर करताना दिसली होती.