'An art of photography', see Tricks
'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:18 PM2019-04-18T16:18:52+5:302019-04-18T16:26:28+5:30Join usJoin usNext फोटो काढणं ही एक कला आहे. अचून निरीक्षण आणि प्रत्येक फोटोसाठी घेतलेला अँगल हे तुमच्या फोटोचं खास वैशिष्ठ ठरतं. मात्र, हटके फोटोसाठी काही ट्रीक्सही वापरता येतील. मोबाईलच्या जमान्यात आज प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे, पण ओमही या फोटोग्राफरने हटके फोटोसाठी एक आयडिया लढवली आहे. त्या ट्रीक्स वापरुन आपण फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडू शकतो. एखाद्या सुंदर नसलेल्या ठिकाणीही फोटो काढून त्या फोटोत सुंदरता भरली जाऊ शकते. जशी दृष्टी तशी सृष्टी असं आपण म्हणतो, तसंच त्या जागेतील सुंदरता फोटोग्राफच्या डोळ्यांनी शोधायला हवी. काय रे देवा... दुसऱ्याचा फोटो चांगला यावा म्हणून फोटोग्राफरला कुठ कुठं लोळावं लागतंय रे धन्य ते फोटोग्राफर अन् धन्य दे फोटो काढण्यासाठी हौशी असलेले कलाकार सध्या वेडिंग फोटोशॉपी हा नवीन ट्रेंड ग्रामीण भागातही रुजू झाला आहे. आपल्या जोडीदारासोबत फोटो काढताना काही ट्रीक्स वापरुन हॉरर, नॅचरल किंवा हटके फोटो काढले जात आहेत. फोटोग्राफरच्या चलाखीने तुम्ही घरी बसूनही वाळंवटात पोहचू शकता किंवा घरी बसूनही काश्मीरमध्ये असल्याचा भास निर्माण करु शकता. काय ते लोकेशन अन् काय ती फोटोग्राफरची आयडिया, भन्नाटय हे सगळं. चित्रपटात पण असंच येड्यात काढत असतील का वो.. क्लोजअप, लाँग शॉट, ड्रोन शॉट आणि इतर इंस्ट्रूमेंट वापरुन फोटोग्राफर तुमचे पैसेच फेडतो. फोटोग्राफरच्या या ट्रीक्समुळे तुमचा दील गार्डन गार्डन झाल्याशिवाय राहत नाही. घ्या ही आता... गावतल्या घरातनं थेट चायनाला पोहोटल्या की या मॅडमटॅग्स :फोटोग्राफकलाPhotograph Movieart