31व्या वाढदिवशी मस्तीच्या मूडमध्ये दिसली तमन्ना भाटीया, फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 03:08 PM 2020-12-21T15:08:54+5:30 2020-12-21T15:17:50+5:30
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिच्या सौंदर्यामुळे रसिकांनी तिला मिल्क हे नाव दिलं आहे. दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला.
2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता.
एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी तमन्ना आता हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव ठरले आहे.
चित्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
तमन्नाने आजवर रसिकांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळल्यास तमन्नाचे सिनेमा सुपरडुपर हिट ठरलेत. त्यामुळेच फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात.
केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना हिरे व्यापाऱ्याची लेक असलेली तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.
रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे.
२०१६ साली ती सोनू सूदसह तुतक तुतक तुतिया सिनेमात झळकली. मात्र हा सिनेमा काही चालला नाही.
तमन्नाला सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात.
मात्र बाहुबली या सिनेमातून रसिकांची मनं जिंकणारी तमन्ना ही हिंदी चित्रपटसृष्टीनेच दिलेली नायिका आहे.
तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सवरही चाहते फिदा असतात.