घारे डोळे अन् दिलखेचक अदा, ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी वामिका गब्बी आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:31 IST2024-12-26T12:09:01+5:302024-12-26T12:31:49+5:30
आता बॉलिवूडमध्ये नव्या ऐश्वर्याची एन्ट्री झाली आहे. एका अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडची सुंदरी आहे. घारे डोळे आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी ऐश्वर्या आजही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पण, आता बॉलिवूडमध्ये नव्या ऐश्वर्याची एन्ट्री झाली आहे. एका अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तिचे डोळे हुबेहुब ऐश्वर्या रायसारखे दिसत आहेत. घारे डोळे असणारी ही अभिनेत्री म्हणजे वामिका गब्बी आहे.
वामिका बेबी जॉन या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमात ती वरुण धवनसह मुख्य भूमिकेत आहे.
वामिकाच्या डोळ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. डोळ्यांमुळे तिची तुलना ऐश्वर्या रायशी होत आहे.
वामिकाने अनेक हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'जब वी मेट' सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
आता 'बेबी जॉन' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ख्रिसमच्या मुहुर्तावर २५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.