'बजरंगी भाईजान' मधील 'मुन्नी'चा नवरात्री स्पेशल लूक; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:38 IST2024-10-04T15:24:25+5:302024-10-04T15:38:51+5:30

नुकतंच नवरात्रोत्सवानिमित्त 'बजरंगी भाईजान' फेम हर्षाली मल्होत्राने सुंदर फोटोशूट केलं आहे.

कालपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सव, गरबा आणि दांडिया हे समीकरणच बनलं आहे.

अशातच 'बजरंगी भाईजान' फेम हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

लाल आणि काळ्या रंगाची घागरा-चोळी परिधान करून इन्स्टाग्रामवर तिने फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये गुजराती लूक त्यावर साजेसे ऑक्साइड दागिने असा पेहराव तिने केला आहे.

'Desi Flexing' असं कॅप्शन देत हर्षलीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

हर्षालीच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे.

'बजरंगी भाईजान' या सिनेमात तिने 'मुन्नी'ची भूमिका साकारून प्रेक्षकाच्या मनात घर केलं.

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतलं होतं.