आरशात पाहिल्यावर स्वतःचा तिरस्कार वाटायचा; या कारणामुळे रोज रडायची अविका गौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 15:43 IST2021-03-08T15:37:44+5:302021-03-08T15:43:44+5:30

Avika Gor's glam photos post weight loss 'बालिका वधू' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली छोटी आनंदी म्हणजेच अविका गौरला आजही रसिक त्याच नावाने ओळखतात.

'बालिका वधू'नंतर अविका गौर 'सिमरन' मालिकेत झळकली आणि त्यानंतर तिने ब्रेक घेतला.

मध्यंतरी तिचे वजनही अतिशय वाढले होते. त्यामुळे वर्कआऊट करत, योग्य डाएट फॉलो करत तिने वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवले.

वजन कमी करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण फॅट टू फिट होण्यापर्यंतचा तिचा प्रवासही सोपा नव्हता.

आता दिसणारी अविका आणि पूर्वीची अविका यांच्यात जमीन आस्मानाचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल.

पूर्वी ती खूप लठ्ठ होती, त्यामुळे तिच्या लूकमध्ये फरक पडला होता.

स्वतःला आरशात पाहणेही ती पसंत करत नव्हती.

इतका स्वतःचा तिरस्कार करायला लागली होती.

मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अविकाने अशक्य ते शक्य करून दाखवले.

विविध फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फिदा होतात.