Sumeet Pusavale : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेत्यानं केलं प्री-वेडिंग फोटोशूट, पाहा रोमॅन्टिक फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 01:49 PM 2022-12-04T13:49:14+5:30 2022-12-04T13:56:22+5:30
Balumama Chya Navan Chang Bhala : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळेने सोशल मीडियावर साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता सुमीतने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत... कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच सुमीत पुसावळे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला.
सुमीतने सोशल मीडियावर साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता सुमीतने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.
मोनिका असं सुमीतच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. मोनिका कमालीची सुंदर आहे.
सुमीत व मोनिकाने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नुकतंच प्री-वेडिंग फोटोशूट केलं. सुमीत व मोनिकाने एकापेक्षा एक स्टायलिश पोझ दिल्या आहेत.
सुमित पूसावळे हा मूळचा दिघंजी गावचा. शालेय शिक्षणानंतर सुमित पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली.
सुमीतला स्वत:चं रेस्टॉरंट उभारायचं होतं. मात्र लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानं त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली.
मुंबईला गेल्यावर त्याला हिंदी चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरगम या चित्रपटातून तो झळकला होता.
त्यानंतर लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो लाइमलाइटमध्ये आला.
2018 मध्ये त्याने ‘लागीरं झालं जी’या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत त्याने साकारलेली महाडिक राजे यांची भूमिकाही गाजली होती.