बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी अंगावर इतकं सोनं का घालतात? खास आहे कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 10:02 AM 2020-11-27T10:02:37+5:30 2020-11-27T10:09:00+5:30
स्वत: बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत यावरून पडदा उठवला होता. त्यांनी एका हॉलिवूड कलाकारामुळे सोनं घालणं सुरू केलं होतं. याबाबतचा एक किस्सा त्यांनी शेअर केला होता. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि कंपोजर बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे काढली. ५०० पेक्षा जास्त गाणी त्यांनी कंपोज केलीत आणि स्वत:साठी एक लीजंड किताब मिळवला आहे.
पॉप म्युझिकला बॉलिवूडचा एक महत्वाचा भाग बनवण्याचं श्रेय बप्पी लहरी यांना जातं. विषय ८० च्या दशकातील सुपरहिट गाण्यांचा असो वा अलिकडे त्यांनी गायलेल्या गाण्याचा असो. त्यांना खास अंदाज नेहमीच पसंत केला जातो.
पण बप्पी लहरी हे केवळ आपल्या गाण्यांसाठीच फेमस नाही तर त्यांच्या अंगावर असलेलं भरमसाठ सोनंही नेहमीच चर्चेचा विषय असतो. बप्पी लहरी बॉलिवूडमधील असे एकुलते एक गायक-कंपोजर आहेत जे इतकं सोनं अंगावर घालतात.
आता फॅन्स तर त्यांना या अवतारात बघण्याची सवय झाली आहे. पण तरीही हा प्रश्न अनेाकांना पडतो की, अखेर ते असं का करतात? बप्पी लहरी इतकं सोनं का घालतात?
स्वत: बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत यावरून पडदा उठवला होता. त्यांनी एका हॉलिवूड कलाकारामुळे सोनं घालणं सुरू केलं होतं. याबाबतचा एक किस्सा त्यांनी शेअर केला होता.
बप्पीदा यांनी सांगितले होते की, मला हॉलिवूड कलाकार एल्विस प्रेस्ली फार आवडत होता. मी पाहिलं होतं की, तो नेहमी एक सोन्याची चेन घालत होते. मी त्यांच्या या अंदाजाने इम्प्रेस झालो होतो.
एल्विस प्रेस्लीला बघून बप्पी लहरी यांनी ठरवलं होतं की, ते जास्त सक्सेसफुल बनून राहतील. त्यावेळी यशस्वी होण्याचं त्यांचं एक खास कारणही होतं. त्यांना तेवढं सोनं घालायचं होतं जेवढे ते करिअरमध्ये यशस्वी होतील.
बप्पी लहरी सोन्याला त्यांच्यासाठी लकी मानतात. आता लोकांना असाही प्रश्न पडतो की, बप्पी लहरी किती किलो सोनं घालून फिरतात? जेव्हा बप्पी लहरी हे निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी याची माहिती दिली होती. त्यावेळच्या माहितीनुसार, बप्पी लहरी यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोनं आणि ४.६२ ग्रॅम चांदी आहे.