चोरीचा आरोप ते आत्महत्येचा प्रयत्न, 'या' बंगाली ब्युटीचा बॉलिवूडमध्येही दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:00 PM2023-12-13T16:00:32+5:302023-12-13T16:10:24+5:30

सुशांतसिंह राजपूतसोबत 'या' अभिनेत्रीने सिनेमात किसींग सीनही दिला होता.

बंगाली सिनेमाची आघाडीची अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी (Swastika Mukherjee) आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 डिसेंबर 1980 रोजी कोलकात्यात जन्मलेली स्वस्तिका बंगाली अभिनेता संतू मुखर्जी यांची मुलगी आहे.

बंगाली टीव्ही मालिका ‘देवदासी’पासून तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरला सुरुवात झाली. 2001 मध्ये ‘हेमंतर पाखी’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. पुढे 2008 मध्ये तिने ‘मुंबई कटिंग’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्येही डेब्यू केला.

स्वस्तिकावर कधीकाळी चोरीचा आरोप झाला होता.2014 मध्ये सिंगापूरमध्ये फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिथे ती ज्वेलरी मॉलमध्ये गोल्ड इअर रिंग्स बॅगमध्ये ठेवताना पकडली गेली होती.

यानंतर ते इयररिंग्स तिने खरेदी केल्याचं आणि आपल्याजवळ त्याची पावती असल्याचं स्पष्टीकरण तिने दिलं होतं. पण तिला पावती दाखवताच आली नाही.

2014 मध्ये स्वस्तिका अचानक चर्चेत आली होती. बॉयफ्रेन्ड सुमनच्या अटकेविरोधात तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वयाच्या 18 व्या वर्षीच स्वस्तिकाने गायक प्रमित सेनशी लग्न केले होते. स्वस्तिकाने पतीवर मारहाण तसेच गरोदरपणात घरात बंद करून ठेवल्याचा आरोप केला होता. 2007 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला.

स्वस्तिका मुखर्जीने सुशांतसिंह राजपूतसोबत 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने सुशांतसोबत किसींग सीनही दिला होता. यानंतर तिने 'कला','दिल बेचारा' या सिनेमांमध्येही भूमिका साकारली.