Ankita Lokhande : "सर्व दोष..."; ब्रेकअपनंतर 2.5 वर्षे सुशांत सिंह राजपूतची वाट पाहत होती अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:51 AM2023-12-10T10:51:01+5:302023-12-10T11:14:12+5:30

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput : अंकिता बिग बॉसमध्ये सातत्याने सुशांतबरोबरच्या तिच्या नात्याबाबत बोलत आहे.

'बिग बॉस हिंदी 17' इतर पर्वांप्रमाणेच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे. या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'ने स्पर्धकांबरोबर चाहत्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली. कपल विरुद्ध सिंगल अशी थीम असलेल्या यंदाच्या 'बिग बॉस'च्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे.

'बिग बॉस'च्या घरात अंकिताने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. या मालिकेतील अर्चना या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती.

सुशांत सिंह राजपूतलाही याच मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील त्यांची अर्चना आणि मानव ही जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. रिल लाइफमध्ये पती पत्नीची भूमिका निभावणारे अंकिता आणि सुशांत खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

अनेक वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. आता इतक्या वर्षांनी अंकिता बिग बॉसमध्ये सातत्याने सुशांतबरोबरच्या तिच्या नात्याबाबत बोलत आहे.

बिग बॉसमध्ये मुनव्वर फारुकीने एका टास्क दरम्यान अंकिताला फोन केला आणि तिच्या 'खूप चांगल्या' वागण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या संभाषणातून अंकिता लोखंडेचा नातेसंबंधांबद्दलचा दृष्टिकोन आणि हार्ट ब्रेकचा भूतकाळातील अनुभव समजला आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, टास्क संपल्यानंतर अंकिता लोखंडे म्हणाली, "माझ्या आयुष्यात एकदा मोठं ब्रेकअप झालं होतं. सर्व संपलं. तो गेल्यावरही मी अडीच वर्षे एकाच गोष्टीवर अडकून राहिले. वाट पाहत होते"

"त्याने माझ्यासोबत काहीही केलं तरी ते चुकीचे नाही अशी भावना माझ्या मनात होती. माझ्या वागण्यात काही चूक असू शकते म्हणून मी संपूर्ण प्रकरण स्वतःवर घेतलं. सर्व दोष स्वत:ला दिला. मी त्याच्याबद्दल कधीही वाईट बोलले नाही."

अंकिता लोखंडे अनेक वर्षांपासून सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. त्यानंतर त्याचं ब्रेकअप झालं. अंकिताने यापूर्वी खुलासा केला होता की ती सुशांतबाबत खूप जास्त पझेसिव्ह होती. अंकिताने 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले.

बिग बॉस 17 मध्ये या आठवड्यात सना रईस खान, अनुराग डोभालल, नील भट्ट, विकी जैन, खानजादी, अभिषेक कुमार, अरुण मशेट्टी आणि मुनव्वर फारुकी हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत.