Bigg Boss Marathi 4 Winners of All season: मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 23:42 IST2023-01-08T23:30:08+5:302023-01-08T23:42:46+5:30
'बिग बॉस'च्या चौथ्या सिझनसाठी अपूर्वा आणि अक्षयमध्ये रंगली होती कॉंटे की टक्कर.

गेली 100 दिवस सुरू असलेल्या बिग बॉस मराठी च्या सीझन 4 चा आज महाअंतिम सोहळा म्हणजेच Grand Finale मोठ्या जोशात पार पडला. टॉप 5 स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली.
किरण माने, अपूर्वा नेमळेकर या दोघांच्या समवेत अक्षय केळकर अंतिम 3 मध्ये आला होता. अखेर इतर दोघांना पराभूत करत, ठाण्याच्या अक्षय केळकरने या सिझन मध्ये बाजी मारली
महेश मांजरेकर यांनी अक्षय केळकरला बिग बॉस ४ ची ट्रॉफी प्रदान केली. नुकताच अक्षय टकाटक २ या सिनेमातही दिसला होता. तरुणींमध्ये तर अक्षय कमालीचा लोकप्रिय आहे. अक्षयने घरात त्याच्या साध्या वागण्याने सर्वांचेच मन जिंकले होते. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये तर त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचे पत्र मिळाले जे यवाबूक करणारे होते. यानंतर त्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच गाजली.
बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वाबद्दल सांगायचे तर तिसऱ्या पर्वात विशाल निकम 'बिग बॉस ३' चा विजेता झाला होता. या पर्वात तर विशालच्या प्रेमप्रकरणाचीच चर्चा जास्त रंगली होती.
बिग बॉस २ चा विजेता होता सर्वांचा लाडका शिव ठाकरे. त्याचा गेम असो, त्याचं साधं वागणं असो किंवा हवा तिथे राग दाखवणं असो हे सर्वच प्रेक्षकांना भावलं होतं. तसंच त्याचे आणि वीणा जगतापचे प्रेमप्रकरणही गाजले होते.
बिग बॉस मराठी हा शो पहिल्यांदा सुरु झाला तो २०१८ मध्ये. या पर्वाची विजेती ठरली होती मेघा धाडे. जिला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. तिच्यामुळे पहिला सिझन चांगलाच गाजला होता.