3 वेळा प्रेमात पडल्यानंतर राहुल रॉयने केले लग्न, पण 14 वर्षानंतर झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 01:23 PM2021-02-09T13:23:53+5:302021-02-09T13:33:39+5:30

लव्हर बॉय प्रेमात ठरला अपयशी

90 च्या दशकात ‘आशिकी’ या सिनेमानंतर एकारात्रीत स्टार झालेला अभिनेता राहुल रॉयचा आज बर्थ डे. आज राहुल त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करतोय. ‘आशिकी’ या सिनेमानंतर लोक राहुलच्या ‘आशिकी’चे दीवाने झाले होते. पण पर्सनल लाईफमध्ये मात्र त्याने अनेक चढऊतार पाहिलेत.

सिल्व्हर स्क्रिनवर भलेही राहुल रॉयच्या रोमान्सची जादू चालली. पण वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे तो पत्नीपासून वेगळा झाला.

‘आशिकी’ हिट झाल्यानंतर राहुल रॉय स्टार झाला होता. साहजिकच अनेक तरूणींप्रमाणे अनेक बॉलिवूडच्या हिरोईन्सही त्याच्यावर फिदा होत्या. या काळात राहुलचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले.

सर्वप्रथम राहुल रॉय व पूजा भट यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. दोघांनीही जुनून, जानम, फिर तेरी कहानी याद आई अशा सिनेमात एकत्र काम केले आणि या सिनेमांच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण पुढे पुढे बिझी शेड्यूलमुळे दोघांच्याही भेटीगाठी दुर्मिळ झाल्या आणि हळूहळू दोघेही एकमेकांपासून दुरावले.

यानंतर राहुलच्या आयुष्यात आली ती मनीषा कोईराला. मझदार आणि अचानक या सिनेमात दोघांनी काम केले. याचदरम्यान मनीषा ‘लव्हर बॉय’ राहुलच्या प्रेमात पडली होती. पण तिथेही करिअर आडवे आले. राहुल इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करत होता. अशात मनीषापेक्षा त्याने करिअरवर फोकस केला आणि यामुळे दोघांमध्ये दुरावा आला.

मनीषा कोईराला आयुष्यातून गेल्यानंतर राहुलचे नाव सुमन रंगनाथन हिच्याशी जोडले गेले. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. सुमन राहुलच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागली होती. असे म्हणतात की, राहुलनेच सुमनला विक्रम भटच्या ‘फरेब’ सिनेमात काम मिळवून दिले होते. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सुमनला साऊथच्याही आॅफर येऊ लागल्या. ती साऊथ सिनेमात बिझी झाली आणि इकडे राहुल एकाकी पडला. तीन वर्षांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

तीन अफेअरनंतर राहुलची भेट मॉडेल राजलक्ष्मी खानविलकरसोबत झाली. राजलक्ष्मीचा अभिनेता समीर सोनीपासून घटस्फोट झाला होता. ती एकटी होती, राहुलही एकटा होता. काही दिवस दोघांनी डेट केले आणि 1998 साली दोघांनी लग्न केले.

राहुल व राजलक्ष्मीचा संसार काही वर्ष सुखात चालला. पण कालांतराने मतभेद वाढले आणि याची परिणीती घटस्फोटात झाली. 2012 साली आपसी सहमतीने दोघेही वेगळे झालेत.

‘आशिकी’ हिट झाल्यानंतर राहुल रॉय स्टार झाला होता. या सिनेमानंतर एक वर्ष त्याच्याकडे काम नव्हते. पण आॅफर आल्यात त्या एकाचवेळी 60 सिनेमांच्या. यापैकी 47 सिनेमे त्याने साईनन केले.

‘आशिकी’ सुपरहिट झाला पण त्यानंतरचे 25 सिनेमे फ्लॉप झालेत आणि हळूहळू राहुलचे स्टारडम कमी होऊ लागले.