IN PICS : टीव्ही शोच्या सेटवरची पहिली भेट प्रेमात बदलली; फिल्मी आहे शिबानी-फरहानची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:16 PM2021-08-27T14:16:59+5:302021-08-27T14:25:53+5:30

प्यारवाली लव्हस्टोरी...! पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर फरहान शिबानीत गुंतला आणि आता हे नातं बरंच पुढे गेलं आहे.

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. आज तिचा वाढदिवस.

शिबानी दीर्घकाळापासून अभिनेता फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर फरहान शिबानीत गुंतला आणि आता हे नातं बरंच पुढे गेलं आहे.

फरहान व शिबानी लव्हस्टोरी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर आज आम्ही हीच हटके लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. ही लव्हस्टोरी सुरू झाली होती ती 2018 साली.

होय, 2018 मध्ये शिबानीच्या आयुष्यात फरहानची एन्ट्री झाली. ‘आय कॅन डू दॅट’ या टीव्ही शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. फरहान शो होस्ट करत होता आणि शिबानी, गुरमीत चौधरी आणि व्हीजे बानीसह अनेक सेलेब्स या शोचा भाग होते.

शिबानीसाठी फरहानने पहिली पत्नी अधुनाला घटस्फोट दिला, असं म्हटलं जातं. पण चर्चा खरी मानाल तर अधुनाला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरानं दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.

‘आय कॅन डू दॅट’ या शोनंतर अचानक फरहान व शिबानीच्या नात्याची चर्चा सुरु झाली आणि काही दिवसांनंतर ‘प्यार किया तो डरना क्या’ असं म्हणत दोघांनीही आपलं नातं जगजाहिर केलं.

शिबानीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यात तिनं कोणाचा तरी हात पकडलेला होता आणि तिची पाठ दिसत होती. फोटो पाहिल्यानंतर लगेचच चाहत्यांना समजलं की तो फरहान अख्तर आहे.नंतर, फरहान अख्तरनं सोशल मीडियावर तोच फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली होती.

यानंतर दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये हे जोडपं पहिल्यांदा अधिकृतपणे लोकांसमोर आले. दोघांनी एकमेकांचा हात पकडून या रिसेप्शनमध्ये एन्ट्री घेतली होती. फरहान व शिबानी यांनी कधीच आपलं नात लपवण्याचा प्रयत्न केला नाही. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात.