जानूच्या अदांवर चाहते फिदा, कधीही पाहिले नसतील जान्हवी कपूरचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:08 PM2020-03-06T13:08:30+5:302020-03-06T13:26:27+5:30

हॅपीवाला बर्थ डे जानू... पाहा बर्थ डे गर्ल जान्हवी कपूरचे फोटो

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर हिचा आज (६ मार्च) वाढदिवस. जान्हवी आजही आईच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेली नाही. जान्हवीसाठी हा मोठा धक्का होता. आज श्रीदेवी आपल्यात नाहीत. पण जान्हवीत श्रीदेवी झलक कायम दिसत राहिल.

‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्युू केला.

लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

जान्हवीला लहानपणापासूनचं मॉडेलिंगची आवड होती.

जान्हवीने धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर २०१५ मध्ये ती कॅलिफोर्नियाला गेली. येथे तिने स्टारबर्ग थिएटर अ‍ॅण्ड फिल्म इंन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवलेत.

‘धडक’ आधी जान्हवीला एक साऊथचा चित्रपट आॅफर झाला होता. या चित्रपटात अभिनेता महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. पण जान्हवीने या चित्रपटाला नकार दिला.

अभिनेत्री व्हायचे, हे जान्हवीने कधीच ठरवून टाकले होते. पण जान्हवीने चित्रपटात यावे, अशी श्रीदेवींची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना जान्हवीला डॉक्टर बनलेले बघायचे होते. पण जान्हवीच्या इच्छेचा आदर करत, अखेर श्रीदेवींनी तिच्या निर्णयाला पाठींबा दिला.

श्रीदेवींनी केवळ जान्हवीला तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी तयार केले नाही तर तिच्या डेब्यू सिनेमाची निवडही श्रीदेवींची होती. ‘धडक’ची स्क्रिप्ट स्वत: श्रीदेवींनी निवडली होती. आपल्या मुलीचा पहिला चित्रपट सुपरहिट व्हावा, तिचा ग्रॅण्ड डेब्यू व्हावा, अशी श्रीदेवींची इच्छा होती.

राजकुमार राव हा जान्हवीचा आवडता अभिनेता आहे. एका मुलाखतीत खुद्द जान्हवीने हे सांगितले होते. मी अनेकदा राजकुमारचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी त्याच्या फोटोवर कमेंट करायचे, असे तिने सांगितले होते.