बाबा निराला ते सचिवजी..., या OTT स्टार्सनी वसूल केली तगडी रक्कम, आकडा करेल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:00 AM 2022-06-13T08:00:00+5:30 2022-06-13T08:00:02+5:30
Highest Paid OTT Actors : पंचायत 2, आश्रम 3 या ओटीटीवरच्या सीरिजनी सध्या धूम केली आहे. ओटीटीचं वाढतं क्रेझ पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर डेब्यू केला आहे आणि तगडी रक्कम वसूल करत आहेत, त्यावरच एक नजर... पंचायत 2, आश्रम 3 या ओटीटीवरच्या सीरिजनी सध्या धूम केली आहे. त्याआधीही मिर्झापूर, सेक्रेड गेम्स, फॅमिली मॅन, स्कॅम 1992 अशा अनेक सीरिज तुफान गाजल्या. ओटीटीचं वाढतं क्रेझ पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर डेब्यू केला आहे आणि तगडी रक्कम वसूल करत आहेत, त्यावरच एक नजर...
अलीकडे रिलीज झालेली ‘आश्रम 3’ ही वेबसीरिज सध्या तुफान गाजतेय. हा सीरिजच्या तिन्ही सीझनमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारली आहे. ‘आश्रम 3’साठी बॉबीने 2 कोटी मानधन घेतलं आहे.
‘पंचायत 2’ ही वेबसीरिजही धुमाकूळ घालतेय. यात अभिनेता जितेन्द्र कुमारने सचिवजीची भूमिका साकारली आहे. ‘पंचायत 2’च्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याने 4 लाख रूपये फी घेतली.
मनोज वाजपेयी अनेक वेबसीरिजमध्ये दिसला. ‘फॅमिली मॅन’ ही त्याची सीरिज प्रचंड गाजली. या सीरिजचा दुसरा पार्टही रिलीज झाला. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी मनोज वाजपेयीने 25 लाख मानधन घेतलं.
‘फॅमिली मॅन’ या सीरिजमध्येच मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारणारी साऊथ स्टार प्रियामणि हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिने या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रूपये चार्ज केलेत.
‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणारा बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याने या सीरिजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘सेक्रेड गेम्स’च्या दोन्ही सीझनमध्ये तो होता. यासाठी सैफ अली खानने 15 कोटी रुपये मानधन घेतले होते.
‘सेक्रेड गेम्स’ गणेश गायतोंडे हे कॅरेक्टर तुफान लोकप्रिय झालं होतं. ही भूमिका साकारली होती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने. ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनसाठी नवाजुद्दीनने 10 कोटी रुपये मानधन घेतले होते.
कालिन भैय्या म्हटलं की पंकज त्रिपाठींचा चेहरा डोळ्यासमोर येतो. मिर्झापूर या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीने अफलातून भूमिका साकारली होती. या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून दुसऱ्या सीझनसाठी पंकज त्रिपाठीने 10 कोटी रुपये मानधन घेतले होते. याशिवाय तो‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनसाठी त्याने 12 कोटी इतकं मानधन घेतलं होतं.
‘स्कॅम 19992’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रतीक गांधी. सीरिजमध्ये हर्षद मेहता साकारण्यासाठी प्रतीकने प्रत्येक एपिसोडसाठी 5 लाख रुपये मानधन घेतले होते.
अली फजल ओटीटीवरचं मोठं नाव आहे. ‘मिर्झापूर’मध्ये त्याने साकारलेली भूमिका सगळ्यांच्याच पसंतीत उतरली. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याने 12 लाख रूपये घेतले होते.
बॉलिवूडची बोल्ड गर्ल राधिका आपटे ओटीटीवरच्या अनेक सीरिजमध्ये झळकली आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सीझनमध्ये ती होती. यासाठी तिने 4 कोटी रूपये फी घेतली होती.
सुनील ग्रोव्हर याने ‘तांडव’ या सीरिजमध्ये साकारलेली भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी सुनीलने 5 लाख रूपये मानधन घेतलं होतं.