IN PICS : ‘ओव्हर कॉफिडन्स’ नडला...! आयशा जुल्काने स्वत:चं संपवलं स्वत:चं करिअर...! By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 03:29 PM 2022-09-30T15:29:53+5:30 2022-09-30T15:43:23+5:30
Ayesha Jhulka : आयशा बॉलिवूडमधून अचानक गायब का झाली? इतकी वर्षे ती इंडस्ट्रीपासून दूर कशी राहिली? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. खुद्द आयशाने या प्रश्नांची उत्तरं दिली.... खिलाडी , जो जीता वही सिकंदर , बलमा , रंग आणि वक्त हमारा है' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का गेल्या अनेक वर्षांपासूप बॉलिवूडमध्ये कुठेही नव्हती. पण नुकतंच तिचं कमबॅक झालं.
तिची ‘हश हश’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. आयशाने ‘कुर्बान’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर जो जीता वही सिकंदर, संग्राम, खिलाडी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आणि मग अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.
आयशा बॉलिवूडमधून अचानक गायब का झाली? इतकी वर्षे ती इंडस्ट्रीपासून दूर कशी राहिली? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. अलीकडे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत खुद्द आयशाने या प्रश्नांची उत्तरं दिली.
12 वर्षे तू इंडस्ट्रीपासून दूर का राहिलीस? असा प्रश्न आयशाला या मुलाखतीत विचारला गेला. यावर कदाचित माझा अतिआत्मविश्वास मला नडला, असं आयशा म्हणाली. ती असं का म्हणाली? तर त्याचाही खुलासा तिने केला.
ती म्हणाली, मी अनेक वर्षे एकाच प्रकारच्या भूमिका केल्यात. सिंपल मुलगी, चुलबुली मुलगी. मी कंटाळले होते. मी वेगळं काही करू शकते, किमान मला संधी तर द्या, असं मला एका टप्प्यावर वाटू लागलं होतं. त्यामुळे अनेक भूमिकांना नकार दिला.
पुढे ती म्हणाली, लार्जर दॅन लाईफ काहीही न मिळाल्यामुळे मी अनेकांना नकार दिला. नकार देताना दु:ख वाटायचं पण बघू तर, असं म्हणत मी नकार देत राहिले. कारण आणखी 5 वर्षे त्याच त्या न आवडणाऱ्या भूमिका करण्यापेक्षा त्यांना नकार देणं मला त्याक्षणी योग्य वाटलं होतं.
पुढे तिनं सांगितलं, मी प्रतीक्षा करायचं ठरवलं. लोक माझ्या नकारामागचं कारण समजतील आणि काही काळानंतर माझ्याकडे येतील, असं मला वाटलं. मी ओव्हर कॉन्फिडन्स झाले होते. हिला काहीतरी चांगली भूमिका आॅफर करावी असं लोकांना वाटेल, याच गैरसमजात मी राहिले.
तिने सांगितलं, मी नकार देत सुटल्यावर नव्या ऑफर येणंच बंद झालं. खूप प्रतीक्षा केली आणि मग प्रतीक्षा करून करून थकले. मग काय, मी आशाचं सोडली.
‘दलाल’ या चित्रपटात मिथुन व आयशावर अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले होते. या चित्रपटातील डबल मिनिंग गाण्यांवरही वाद झाला होता. या वादावर स्पष्टीकरण देताना आयशाने माझ्या नकळत हे बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आल्याचा आरोप केला होता.
बोल्डनेसचं हे प्रकरण कोर्टातही गेलं. या वादानंतर आयशाचं करिअर जवळजवळ संपुष्टात आलं आणि आयशा बॉलिवूडमधून बाद झाली. 2003 पर्यंत आयशाचे करिअर जवळजवळ संपुष्टात आलं होतं.
2003नंतर ती सिनेमांमध्ये मुख्य नायिकेच्या नव्हे तर सहायक अभिनेत्रीच्या रुपात झळकू लागली होती. याचकाळात तिने लग्नाचा निर्णय घेतला. 2003मध्ये आयशाने समीर वाशी नावाच्या तरुणाशी लग्न केलं. मुंबईतील अंधेरी स्थित तिरुपती अपार्टमेंटमध्ये आयशा आपल्या कुटुंबासोबत राहते. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचं नाव स्नेह जुल्का आहे.