या अभिनेत्रींनी लग्नानंतरही सिनेमात बिनधास्तपणे केला रोमान्स, ना किस घेताना संकोचल्या, ना इंटिमेट सिनमध्ये अडखळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 04:25 PM2022-10-27T16:25:02+5:302022-10-27T16:28:58+5:30

Bollywood Actress Bold & Intimate Scene : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता. जेव्हा लग्न झाल्यावर अभिनेत्रींची कारकीर्द संपुष्टात येत असे. त्याची अनेक उदाहरणेही आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. तसेच अनेक अभिनेत्रींनी लग्न आणि बाळंतपणानंतरही सिनेजगतात पुनरागमन केले आहे. एवढंच नाही तर आता अभिनेत्री लग्नानंतरही बिनधास्तपणे बोल्ड सिन देऊ लागल्या आहेत. या अभिनेत्रींची यादी पुढीलप्रमाणे आहे.

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता. जेव्हा लग्न झाल्यावर अभिनेत्रींची कारकीर्द संपुष्टात येत असे. त्याची अनेक उदाहरणेही आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. तसेच अनेक अभिनेत्रींनी लग्न आणि बाळंतपणानंतरही सिनेजगतात पुनरागमन केले आहे. एवढंच नाही तर आता अभिनेत्री लग्नानंतरही बिनधास्तपणे बोल्ड सिन देऊ लागल्या आहेत. या अभिनेत्रींची यादी पुढीलप्रमाणे आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने रणबीर सिंह याच्याशी लग्न केलं आहे. मात्र लग्नानंतरही तिने चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या गहराईयाँ चित्रपटामध्ये तिने दिलेले बोल्ड आणि इंटिमेट सिन पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले होते. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये खूप बोल्ड आणि रोमँटिक सिन चित्रित झाले होते. त्यावर चाहत्यांचाही विश्वास बसत नव्हता.

ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून आहे. तिने अभिषेक बच्चनशी विवाह केला आहे. लग्नानंतर ऐश्वर्याने अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन केलं होतं. तसेच तिने ऐ दिल ए मुश्किल चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत खूप इंटिमेट सिन दिले होते. या सिन वरून बच्चन कुटुंबामध्ये खूप वादविवाद झाले होते.

काजोलने सुद्धा लग्नानंतर काही वर्षे चित्रपटातून ब्रेक घेतला होता. मात्र आमीर खानसोबतच्या फना चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. या चित्रपटात काजोलने काही इंजिमेट सिन दिले होते.

लग्नच नाही तर दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही करिना कपूर चित्रपटात काम करत आहे. तसेच चाहत्यांकडूनही तिच्या कामाचं कौतुक होत असतं. दरम्यान, की अँड का चित्रपटात करिनाने अर्जुन कपूरसोबत किसिंग सिन देऊन खळबळ उडवली होती.