Yuvraj Singhसोबत सेल्फी घेताना दिसली Kareena Kapoor, दोघांचेही फोटो social mediaवर झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:07 AM2021-10-08T10:07:58+5:302021-10-08T10:12:48+5:30

Kareena Kapoor & Yuvraj Singh: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान मुंबईमधील वांद्रे परिसरामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत दिसून आली. करिना आणि युवराजचे एकत्रित फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान मुंबईमधील वांद्रे परिसरामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत दिसून आली. करिना आणि युवराजचे एकत्रित फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या फोटोंमध्ये व्हाईट कलरच्या ट्रॅक सूटमध्ये युवराज सिंग खूप हँडसम दिसत होता. तर पिंक कलरचे जॅकेट आणि ब्लॅक लोअरमध्ये करिना कपूरही सुंदर दिसत होती.

करिना कपूर फोटोग्राफर्सना स्टायलिश पोझ देताना दिसत होती. तर युवराज सिंगही मागे नव्हता. त्यानेही फोटोग्राफर्सना भरपूर फोटो काढू दिले.

करिना कपूरने याच ड्रेसमधील आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो फॅन्सकडून लाईक केले जात आहेत.

युवराज सिंगसुद्धा वांद्रे येथे पायऱ्यांवर बसून बिनधास्त अंदाजाच पापाराझींना पोझ देताना दिसत होता.

करिना कपूर आणि युवराज सिंग यांची बॉडी लँग्वेज पाहून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, असे वाटत नव्हते.

करिना कपूर आपल्या बिनधास्त अंदाजामध्ये युवराज सिंगसोबत सेल्फी घेताना दिलत होती.

करिना कपूर आणि युवराज सिंग एका स्पोर्ट्स ब्रँडच्या शुटिंगसाठी एकत्र आले होते.