मिथून चक्रवर्ती ते प्रिती झिंटा! 'या' सुपरस्टार्सने दत्तक घेतलीयेत मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:00 AM2022-07-06T06:00:00+5:302022-07-06T06:00:00+5:30

Bollywood celebrities: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी स्वत:ची मुलं असूनही त्यांनी दुसऱ्या मुलांना दत्तक घेतलं आहे.

सध्याच्या काळात बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा होत असते. यामध्ये बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी स्वत:ची मुलं असूनही त्यांनी दुसऱ्या मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यामुळे हे कलाकार कोणते ते पाहुयात.

सलीम खान- बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना स्वत: ची चार मुलं आहेत. मात्र, तरीदेखील त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं आहे.

आर्पिता खान हिला सलीम यांनी दत्तक घेतलं आहे. विशेष म्हणजे तिच्यामध्ये आणि अन्य मुलांमध्ये त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. तिचं लग्नदेखील मोठ्या थाटात करुन दिलं.

मिथून चक्रवर्ती- बॉलिवूड सुपरस्टार मिथून चक्रवर्ती यांनीही एका मुलीला दत्तक घेतलं आहे. दिशानी असं तिचं नाव आहे.

दिशानी कलाविश्वात सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे.

रवीना टंडन - अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली रविना टंडन हिने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं.

छाया आणि पूजा या तिच्या दत्तक घेतलेल्या मुली असून त्या ८ व ११ वर्षांच्या असतानाच तिने त्यांना दत्तक घेतल. त्यानंतर तिने अनिल थडानीसोबत लग्न केलं.

सुष्मिता सेन - माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या लेकींविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. सुष्मिताने वयाच्या २५ व्या वर्षी तिची पहिली लेक रेनी हिला दत्तक घेतलं.

रेनीनंतर तिने अलीशाला दत्तक घेतलं. बऱ्याचदा सुष्मिता तिच्या लेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

प्रिती झिंटा - बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा अलिकडेच दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. मात्र, यापूर्वी तिने काही मुलींना दत्तक घेतलं आहे.

प्रितीने तिच्या ३४ व्या वाढदिवशी ३४ मुलींना दत्तक घेतलं. या मुलींच्या शिक्षणापासून खाण्यापिण्यापर्यंतचा सर्व खर्च प्रिती करते.

सनी लिओनी - पॉर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनीने निशाला दत्तक घेतलं आहे.

सनी आणि तिचा नवरा डॅनियल यांनी परस्पर संमतीने निशाला दत्तक घेतलं. त्यानंतर सनीने सरगेसीच्या मदतीने 2 मुलांनाही जन्म दिला.