Bollywood : स्टारकिड्सची पार्टी रंगली, अजय देवगणची लेक न्यासा पुन्हा ट्रोल; 'त्या' खास फोटोची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:07 PM2023-02-13T13:07:42+5:302023-02-13T13:23:31+5:30

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचीच जोरदार चर्चा.

सध्या बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा स्टारकिड्सच जास्त लक्ष वेधून घेत आहेत. जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांनी तर आधीच सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. आता शनाया कपूर, न्यासा देवगण, पलक तिवारी, इब्राहिम अली खान सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

कालही रविवारी स्टारकिड्सची पार्टी रंगली. सगळेच अगदी स्टायलिश अंदाजात दिसले. यात पुन्हा एकदा अजय देवगण ची लेक न्यासा देवगणने लक्ष वेधले. न्यासा कुठेही दिसली तरी ती ट्रोलच होते.

काही वर्षांपूर्वी न्यासा प्रचंड सावळी आणि साधी दिसत होती. मात्र अचानक तिचा बदललेला लुक चाहत्यांच्या काही पचनी पडलेला नाही. म्हणूनच तिला ट्रोल करायची एकही संधी चाहते सोडत नाहीत.

कालच्या पार्टीत न्यासाने फिक्या गुलाबी रंगाचा वन पीस घातला होता. हा खूपच शॉर्ट आणि स्लीव्हलेस वनपीस होता. तर व्हाईट रंगाचे हाय हील्स तिने घातले होते. या स्टायलिश लुकमध्ये ती पार्टीत दाखल झाली. मात्र इथेही तिला ट्रोलच करण्यात आले.

न्यासाचा झालेला हा कायापालट सर्जरी केल्यानेच झाला असल्याचा युझर्सला संशय आहे. त्यामुळे नेटकरी तिला सर्जरी क्वीन असेच म्हणायला लागले आहेत.

सर्व स्टारकीड्सचा कॉमन फ्रेंड ओरी सुद्धा सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. स्टारकिड्सचे कित्येक फोटो ओरीसोबत जास्त असतात. ओरीचं खरं नाव ओरहान अवतरमानी आहे. त्यानेच कालच्या पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पार्टीत आणखी एका फोटोने लक्ष वेधले ते म्हणजे इब्राहिम अली खान आणि न्यासा देवगणची वाढती जवळीक. त्यांच्या या फोटोंवर दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगत आहे.

न्यासा देवगण आणि इब्राहिम अली खान शिवाय पार्टीत इतरही स्टारकिड्सने हजेरी लावली. यामध्ये श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी, अर्जुन रामपालची लेक माहिका रामपाल, जावेद जाफरीची लेक अलविया यांचाही समावेश होता.