Year End 2022 : सरत्या वर्षात ‘या’ 10 ‘लो बजेट’ सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली छप्परफाड कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:27 PM 2022-12-14T17:27:13+5:30 2022-12-21T15:24:55+5:30
Year End 2022 : 2022 मध्ये अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तर काही सिनेमे दणकून आपटले. काही सिनेमांनी मात्र खरंच कमाल केली. कमी बजेटच्या या सिनेमांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा बजेट फक्त 25 कोटी रूपये होता. या चित्रपटाने किती कोटी कमावले तर तब्बल 340 कोटी.
‘सरदार’ नावाचा टॉलिवूडचा सिनेमाही यंदा गाजला. कार्थी, राशी खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा बजेट होता 20 कोटी आणि या सिनेमाने कमावले 104 कोटी.
धनुष आणि नित्याचा ‘थिरूचित्रम्बलम’ हा साऊथचा सिनेमा फक्त 30 कोटींमध्ये तयार झाला. या सिनेमाने 110 कोटींची कमाई केली.
अजय देवगण, तब्बूचा ‘दृश्यम 2’ या सिनेमावर 50 कोटींचा खर्च झाला आणि या सिनेमाने 212.86 कोटींचा बिझनेस केला. अद्यापही हा सिनेमा गर्दी खेचतोय.
‘कांतारा’ या सिनेमाची यंदा जोरदार चर्चा झाली. हा सिनेमा केवळ 16 कोटींत बनून तयार झाला आणि जगभर या सिनेमाने 397 कोटींची कमाई केली.
निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, अनुपम खेर अशी स्टार कास्ट असलेल्या ‘कार्तिकेय 2’ या सिनेमाचा बजेट होता 16 कोटी आणि या सिनेमाने 120 कोटींचा गल्ला जमवला.
सीतारमन हा रश्मिका मंदाना, दुलकीर सलमान, मृणाल ठाकूरचा सिनेमा 30 कोटींमध्ये तयार झाला. या सिनेमाने 91.4 कोटींचा बिझनेस केला.
अदिवी शेष, प्रकाश राज, शोभिता धुपिवाला अशी स्टार कास्ट असलेल्या ‘मेजर’ या सिनेमाचा बजेट होता 32 कोटी. या सिनेमाने कमावले दुप्पट 66 कोटी.
‘777 चार्ली’ हा सिनेमा 20 कोटीत तयार झाला आणि या सिनेमाने 150 कोटींची बम्पर कमाई केली.
‘डीजे टिल्लू’ या सिनेमावर फक्त 10 कोटी खर्च झाला. या सिनेमाने 30 कोटींचा बिझनेस केला.