१० वर्षात १५ फ्लॉप चित्रपट, तरीही ११५ कोटींची मालकीण आहे ही 'बेबी डॉल' By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:04 PM 2024-01-31T13:04:48+5:30 2024-01-31T13:14:32+5:30
बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आणि हिट चित्रपट देण्यासाठी अभिनेत्री रात्रंदिवस मेहनत करतात. पण तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल माहिती आहे का, जिने गेल्या १० वर्षात १५ पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत, तरीही तिची कमाई करोडोंमध्ये आहे. बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आणि हिट चित्रपट देण्यासाठी अभिनेत्री रात्रंदिवस मेहनत करतात. पण तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल माहिती आहे का, जिने गेल्या १० वर्षात १५ पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत, तरीही तिची कमाई करोडोंमध्ये आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या खऱ्या कथेत चित्रपटांप्रमाणेच अनेक चढ-उतार आले आहेत. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने अभिनयात फारशी चमक दाखवली नसली तरीही ती लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे.
बॉलिवूडमध्ये दोन-तीन फ्लॉप चित्रपट येताच लोक अभिनेत्रीबद्दल बोलू लागतात. तिचा काळ गेला, अशी चर्चा कलाविश्वात होऊ लागते. पण एक अशी अभिनेत्री आहे जिने सलग १५ फ्लॉप चित्रपट दिले, पण तिच्या लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा आलेख घसरला नाही. ही अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.
२०१२ मध्ये पूजा भटने जिस्म २ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातून सनी लिओनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली आणि लोकांना सनीही खूप आवडले.
सनीची कामगिरी सरासरी होती पण तिच्या स्पष्टवक्तेपणाने आणि ग्लॅमरस लुकने लोक प्रभावित झाले. बेबी डॉल मैं सोने दी या गाण्यानंतर तिला बेबी डॉल म्हटले जाऊ लागले.
मात्र, अभिनेत्री म्हणून तिची कारकीर्द चांगली राहिली नाही. गेल्या १० वर्षातील १५ फ्लॉप चित्रपटांचा आलेख हे सिद्ध करतो की तिने प्रयत्न केले परंतु हिट देण्यात अपयशी ठरली.
तिच्या लोकप्रियतेवर आणि कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. ती अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्स करते.
तिच्या लोकप्रियतेवर आणि कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. ती अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्स करते.