१९ वर्षीय राशा थडानीचं ४० वर्षीय विवाहित अभिनेत्यावर आहे क्रश, जाणून घ्या कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:01 IST2025-01-24T09:42:22+5:302025-01-24T10:01:31+5:30
Raveena Tandon Daughter Rasha Thadani : रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील काम पाहून राशाचे खूप कौतुक होत आहे.

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील काम पाहून राशाचे खूप कौतुक होत आहे.
विशेषत: राशाचे 'उई अम्मा' हे गाणे रिलीज होताच चार्टलिस्टमध्ये सामील झाले. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, कोणता अभिनेता तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश आहे.
१९ वर्षीय राशाने मिस मालिनीसोबतच्या मुलाखतीदरम्यान अशी गोष्ट सांगितली की तिचे वक्तव्य काही मिनिटांतच व्हायरल झाले.
राशाला तिचा पहिला क्रश कोणता सेलिब्रिटी आहे, असे विचारण्यात आले. या प्रश्नावर राशाने असे उत्तर दिले की कियारा अडवाणीला नक्कीच हेवा वाटेल.
या प्रश्नाचे उत्तर देताना राशाने सिद्धार्थ मल्होत्राचे नाव घेतले. ती म्हणाली की केवळ मीच नाही तर अमननेही त्याच्या सह-अभिनेत्रीचे नाव घेऊन तिची निवड योग्य असल्याचे सांगितले.
त्यानंतर अमनने सांगितले की, त्यालाही 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये सिद्धार्थ आवडला होता. आलिया भट खूपच क्यूट दिसत होती.
अजय देवनचा नातेवाईक अमन देवगणने सांगितले की, त्याचा पहिला सेलिब्रिटी क्रश दिया मिर्झा आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केलंय. त्याने २०२३ मध्ये कियारासोबत लग्न केले.
सिद्धार्थ मल्होत्रा शेवटचा 'योद्धा'मध्ये दिसला होता. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.